Yashwantrao Chavan Senior Citizen Award 2026: यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मानासाठी अर्जांचे आवाहन - Rayat Samachar

Yashwantrao Chavan Senior Citizen Award 2026: यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मानासाठी अर्जांचे आवाहन

२० ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत

rayatsamachar
3 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

मुंबई | गुरुदत्त वाकदेकर

Yashwantrao Chavan Senior Citizen Award 2026: ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यभर समाजाला दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी प्रदान करण्यात येणारा ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान’ यंदा २६व्या वर्षात पदार्पण करत आहे. १ ऑक्टोबर या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात येणार असून, त्यासाठी महाराष्ट्रभरातून १ जुलै ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत.

पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथील मुख्य सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
सेवानिवृत्तीनंतरही अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या अनुभव, ज्ञान आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत. कोणत्याही अपेक्षेशिवाय समाजासाठी योगदान देणाऱ्या अशा समाजाभिमुख कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे हा या कृतज्ञता सन्मानाचा प्रमुख उद्देश आहे.
या सन्मानातून ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाचा गौरव करण्याबरोबरच समाजासाठी कार्य करणाऱ्या इतर व्यक्तींनाही प्रेरणा मिळावी, असा प्रयत्न करण्यात येत आहे.
राज्यस्तरीय वैयक्तिक सन्मानासाठी दोन महिला, दोन पुरुष, एक तृतीयपंथी व्यक्ती आणि एक दिव्यांग व्यक्ती यांची निवड करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक संघ किंवा संस्थेसाठी स्वतंत्र राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान दिला जाणार आहे.
वैयक्तिक तसेच संस्थात्मक स्तरावर समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पात्र ज्येष्ठ नागरिकांचा आणि संघटनांचा गौरव करण्यात येणार आहे. सन्मानित मान्यवरांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि सन्मान निधी प्रदान करण्यात येईल.
महाराष्ट्रातील पात्र ज्येष्ठ नागरिक संघ आणि संस्थांनाही स्वतंत्र राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मानासाठी अर्ज करता येणार आहे. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, विज्ञान, शिक्षण, आरोग्य, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विधी व न्याय तसेच पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पात्र संघ-संस्थांना या सन्मानासाठी अर्ज करता येईल.
वैयक्तिक तसेच ज्येष्ठ नागरिक संघ किंवा संस्थेसाठी ऑनलाइन आणि PDF अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पात्र अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी.
वैयक्तिक ऑनलाइन अर्ज
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा
वैयक्तिक PDF अर्ज
PDF अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था ऑनलाइन अर्ज
संघ/संस्थेसाठी ऑनलाइन अर्ज येथे भरा
ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था PDF अर्ज
संघ/संस्था PDF अर्ज डाउनलोड करा

महत्त्वाचे: अर्ज ई-मेल, WhatsApp किंवा इतर माध्यमातून पाठविल्यास ते ग्राह्य धरले जाणार नाहीत. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज टपालाने किंवा कुरिअरने पाठविणे आवश्यक आहे.

अर्जाची अंतिम मुदत : २० ऑगस्ट २०२६

अधिक माहितीसाठी मनिषा खिल्लारे यांच्याशी ०२२-२२०४५४६० / ०२२-२२०२८५९८ (विस्तारित क्र. २२४) या क्रमांकावर संपर्क साधता येईल. कार्यालयीन वेळ सोमवार ते शुक्रवार, सकाळी ११ ते सायंकाळी ६ अशी आहे.
या उपक्रमाची माहिती पात्र ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक संघ आणि संस्थांपर्यंत पोहोचवून त्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटरचे संयोजक विजय कान्हेकर आणि आरोग्य, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक विभागाच्या विभागप्रमुख दिपिका शेरखाने यांनी केले आहे.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading