श्रीरामपूर | २८.७ | रयत समाचार
(Farhan Bagwan Warwick) येथील फरहान बागवान यांना ब्रिटनमधील प्रतिष्ठित वॉरविक विद्यापीठाकडून एमएससी मॅनेजमेंट (MSc Management- Master in Management) ही व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. या उल्लेखनीय यशामुळे फरहान यांनी केवळ श्रीरामपूरच नव्हे, तर महाराष्ट्र आणि देशाचेही नाव उज्ज्वल केले.
(Farhan Bagwan Warwick) उपलब्ध माहितीनुसार, वॉरविक विद्यापीठातून व्यवस्थापन विषयातील ही पदवी प्राप्त करणारे फरहान बागवान हे बागवान समाजातील देशातील पहिले विद्यार्थी ठरले आहेत. त्यांच्या या यशाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
(Farhan Bagwan Warwick) फरहान यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्रीरामपूर येथील विद्यानिकेतन अकॅडमीमध्ये झाले. शालेय जीवनापासूनच ते अभ्यासात नेहमीच आघाडीवर होते. त्यानंतर त्यांनी पुण्यातील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (BMCC) येथून वाणिज्य शाखेची पदवी विशेष प्राविण्यासह संपादन केली.
यानंतर त्यांनी ब्रिटनमधील प्रतिष्ठित वॉरविक विद्यापीठात एमएससी मॅनेजमेंट (Master in Management) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविला आणि यशस्वीरीत्या शिक्षण पूर्ण करून ही मानाची पदवी प्राप्त केली.
१९६५ मध्ये स्थापन झालेले वॉरविक विद्यापीठ हे युनायटेड किंग्डममधील अग्रगण्य विद्यापीठांपैकी एक मानले जाते. येथे जगभरातील शेकडो देशांतील विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अत्यंत स्पर्धात्मक असून, IELTS किंवा TOEFL सारख्या इंग्रजी प्राविण्य परीक्षांमध्ये यश मिळविणे आवश्यक असते. येथील पदवीधरांना जागतिक स्तरावरील नामांकित कंपन्यांमध्ये करिअरच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध होतात.
फरहान हे ज्येष्ठ पत्रकार हाजी शफीकभाई बागवान आणि श्रीरामपूर नगरपालिकेच्या सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका हज्जन परवीन बागवान यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, श्रीरामपूरसह संपूर्ण राज्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
🎓 श्रीरामपूरच्या फरहान बागवान यांची जागतिक स्तरावर ऐतिहासिक कामगिरी! ब्रिटनच्या प्रतिष्ठित वॉरविक विद्यापीठातून एमएससी मॅनेजमेंट पदवी संपादन करून त्यांनी शहराचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केले. संपूर्ण बातमी वाचा – रयत समाचार.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


