अहमदनगर | २२.७ | रयत समाचार
(DINDI Way of Life) आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत Rayat Chitra Films प्रस्तुत ‘दिंडी | Way of Life’ हा निरीक्षणप्रधान (Observational) मराठी लघुपट ता.२५ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता युट्यूब प्रिमियरद्वारे प्रथमच प्रदर्शित होत आहे. ‘पंढरीची वारी : समतेची समृद्ध जीवनपद्धती’ हा विचार केंद्रस्थानी ठेवून साकारलेला हा ३ मिनिटे ०८ सेकंदांचा लघुपट वारकरी परंपरेतील समता, सेवा, शिस्त, सहकार्य, परस्पर सन्मान, भक्ती आणि माणुसकीच्या मूल्यांचे प्रभावी दर्शन घडवतो.
(DINDI Way of Life) या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे संपूर्ण चित्रीकरण एकाच सलग (Single Continuous Shot) दृश्यात करण्यात आले आहे. कोणतेही कृत्रिम नाट्य, मुलाखती किंवा स्पष्टीकरणात्मक निवेदन न वापरता वास्तवदर्शी दृश्यांद्वारे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पंढरीच्या वारीचा अनुभव देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
(DINDI Way of Life) विशेष म्हणजे, या लघुपटाचे संपूर्ण चित्रीकरण, संपादन आणि अंतिम मास्टरिंग Samsung Galaxy S24 FE या स्मार्टफोनवर करण्यात आले आहे. मर्यादित साधनसामग्रीतही दर्जेदार आणि आशयप्रधान चित्रनिर्मिती करता येते, याचे हे उल्लेखनीय उदाहरण आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन भैरवनाथ चंद्रभागा तुकाराम वाकळे यांनी केले असून, निवेदनासाठी किरण दत्तराज डहाळे यांनी आवाज दिला आहे. चित्रपटाच्या समारोपात संत तुकाराम महाराजांचा “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने…” हा अभंग समाविष्ट करण्यात आला असून, त्यामुळे चित्रपटाचा आशय अधिक प्रभावीपणे अधोरेखित होतो.
‘दिंडी | Way of Life’ हा लघुपट वारकरी धर्माला समर्पित असून, पंढरीची वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून समता, सेवा, शिस्त, सहकार्य, परस्पर सन्मान आणि माणुसकी यांवर आधारलेली समृद्ध जीवनपद्धती आहे, हा संदेश व्यापक समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व वारकरी, चित्रपटप्रेमी, संशोधक, विद्यार्थी आणि समाजातील सर्व घटकांनी २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता युट्यूब प्रिमियरमध्ये सहभागी होऊन हा लघुपट पाहावा, असे आवाहन दिग्दर्शक भैरवनाथ वाकळे यांनी केले आहे.
चित्रपटाची माहिती – चित्रपट : दिंडी | Way of Life
प्रकार : निरीक्षणप्रधान मराठी लघुपट (Observational Short Film)
कालावधी : ३ मिनिटे ०८ सेकंद
भाषा : मराठी
प्रस्तुती : Rayat Chitra Films
संकल्पना, निर्मिती व दिग्दर्शन : भैरवनाथ चंद्रभागा तुकाराम वाकळे
निवेदन : किरण दत्तराज डहाळे
चित्रीकरण, संपादन व मास्टरिंग : Samsung Galaxy S24 FE
प्रदर्शन : २५ जुलै २०२६
वेळ : सकाळी ७.०० वाजता
माध्यम : YouTube Premiere
YouTube Premiere Link : https://youtu.be/70C-G_Y65f4?si=rLRe4DDHuT3UD8QJ
“पंढरीची वारी : समतेची समृद्ध जीवनपद्धती”
हा चित्रपट वारकरी धर्माला समर्पित आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


