Maharashtra Bandh | दिल्ली विद्यार्थी आंदोलनावरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ 23 जुलैला 'महाराष्ट्र बंद'; डाव्या पक्षांचे सर्व लोकशाहीवादी शक्तींना आवाहन - Rayat SamacharMaharashtra Bandh | दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ २३ जुलैला महाराष्ट्र बंद; डाव्या पक्षांचा पाठिंबा

Maharashtra Bandh | दिल्ली विद्यार्थी आंदोलनावरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ 23 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’; डाव्या पक्षांचे सर्व लोकशाहीवादी शक्तींना आवाहन

दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध; वंचित बहुजन आघाडीसह डावे पक्ष, इंडिया आघाडीतील घटक व विविध संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन

rayatsamachar
2 Min Read
२३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा जाहीर करताना डाव्या पक्षांच्या संयुक्त बैठकSubEditor | Dipak Shirasath

मुंबई | २१.७ | रयत समाचार

(Maharashtra Bandh) दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर केलेल्या अन्यायकारक पोलिस कारवाईच्या निषेधार्थ २३ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या हाकेला राज्यातील डाव्या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला. या बंदमध्ये सर्व लोकशाहीवादी पक्ष, संघटना आणि जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन डाव्या पक्षांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आल्साची माहिती ॲड.कॉ. सुभाष लांडे यांनी दिली.

(Maharashtra Bandh) या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप), शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माले), सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षांची तातडीची ऑनलाइन बैठक पार पडली. बैठकीत २३ जुलैचा बंद व्यापक स्वरूपात यशस्वी करण्यासाठी सर्व लोकशाहीवादी शक्तींनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.

(Maharashtra Bandh) डाव्या पक्षांनी म्हटले की, नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी, शिक्षण क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार आणि अनागोंदी, तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष करून ते दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमाराचा निषेधही व्यक्त करण्यात आला.

 

पुढे असा आरोप करण्यात आला की, २० जुलै रोजी संसदेवर आयोजित मोर्चादरम्यान देशभरातून आलेल्या विद्यार्थी, युवक आणि पालकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या कारवाईत अनेक आंदोलक जखमी झाल्याचा तसेच अटकेनंतरही काही आंदोलकांशी गैरवर्तन झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
डाव्या पक्षांनी केंद्र सरकारवर आंदोलन दडपण्याचा आरोप करत, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध म्हणून २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये इंडिया आघाडीतील सर्व पक्ष, सामाजिक संघटना, कामगार, शेतकरी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
या बैठकीस भाकपचे ॲड. सुभाष लांडे, माकपाचे डॉ. अजित नवले, शेकापचे राजेंद्र कोरडे, भाकप (माले)चे उदय भट, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे किशोर ढमाले आणि फॉरवर्ड ब्लॉकचे किशोर कर्डक उपस्थित होते.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading