Filmytell Digital Release | थिएटर किंवा OTT ची वाट पाहू नका! Filmytell वर प्रदर्शित करा तुमचा चित्रपट - Rayat SamacharFilmytell : Filmytell Digital Release चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी भारतातील आधुनिक डिजिटल रिलीज प्लॅटफॉर्म

Filmytell Digital Release | थिएटर किंवा OTT ची वाट पाहू नका! Filmytell वर प्रदर्शित करा तुमचा चित्रपट

Pay-per-View डिजिटल रिलीज प्लॅटफॉर्म 'Filmytell' चे निर्माते, दिग्दर्शक, प्रॉडक्शन हाऊस आणि स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांना आवाहन

rayatsamachar
3 Min Read
Filmytell : जगभरातील प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचविणारे आधुनिक Pay-per-View डिजिटल रिलीज मंचSubEditor | Dipak Shirasath

मुंबई | १८.७ | रयत समाचार

(Filmytell Digital Release) भारतातील चित्रपट वितरण क्षेत्रात डिजिटल क्रांती घडविण्याच्या दिशेने Filmytell या आधुनिक Pay-per-View (PPV) डिजिटल रिलीज प्लॅटफॉर्मने निर्माते, दिग्दर्शक आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी नवे दालन खुले केले. “Your Pocket Theater” या संकल्पनेवर आधारित Filmytell मुळे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी थिएटर, OTT करार किंवा पारंपरिक वितरकांवर अवलंबून राहण्याची गरज नसून निर्मात्यांना थेट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे.

(Filmytell Digital Release) Filmytell हे असा मंच आहे जिथे प्रत्येक प्रेक्षक स्वतंत्रपणे चित्रपट भाड्याने (Rental Basis) पाहतो. त्यामुळे निर्मात्याला प्रत्येक व्ह्यूमधून थेट महसूल मिळतो. प्लॅटफॉर्मवर कोणतीही मासिक सदस्यता (Subscription) किंवा जाहिरातींचा अडथळा नसल्याचा दावा कंपनीने केला.

(Filmytell Digital Release) कंटेंटवरील संपूर्ण नियंत्रण निर्मात्यांकडे : Filmytell वर चित्रपट प्रदर्शित करताना रिलीज तारीख, भाडे दर (Rental Price), प्रमोशनल ऑफर्स, उपलब्धता आणि किंमत बदलण्याचा अधिकार पूर्णपणे निर्मात्याकडेच राहतो. त्यामुळे आपल्या चित्रपटाचे व्यावसायिक नियोजन निर्माते स्वतः करू शकतात.

हे ही पहा : युद्ध संपले, माणुसकी जिवंत राहिली : १३ जुलै १६००, सुलताना चांदबीबी स्मृतिदिन

कोणता कंटेंट स्वीकारला जातो? : Filmytell वर अशा प्रकारचा कंटेंट प्रदर्शित करता येतात. फीचर फिल्म, शॉर्ट फिल्म, वेब सिरीज, मिनी सिरीज, आर्ट आणि फेस्टिव्हल फिल्म, सामाजिक व शैक्षणिक चित्रपट, भारतीय प्रादेशिक भाषांतील तसेच प्रमुख परदेशी भाषांतील चित्रपट.
मालकी हक्क कायम, जागतिक प्रेक्षकांची संधी : Filmytell चे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटाचे Intellectual Property (IP) आणि मालकी हक्क निर्मात्याकडेच कायम राहतात. याशिवाय महसूल वाटप पारदर्शक असून साप्ताहिक तसेच आवश्यकतेनुसार दैनिक सेटलमेंटची सुविधाही उपलब्ध आहे. प्लॅटफॉर्म Android, iOS, Web Browser आणि Google TV वर उपलब्ध असल्याने जगभरातील प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचणे शक्य होते.
स्वतंत्र आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी नवी आशा : आजही अनेक दर्जेदार चित्रपटांना थिएटर उपलब्ध होत नाहीत, OTT प्लॅटफॉर्मवर स्थान मिळण्यास विलंब होतो किंवा वितरण खर्च परवडत नाही. अशा परिस्थितीत Filmytell हे स्वतंत्र, प्रादेशिक, प्रयोगशील आणि माहितीपट निर्मात्यांसाठी प्रभावी डिजिटल वितरण पर्याय म्हणून पुढे येत आहे.
कंपनीचा संदेश : Your Story. Your Audience. Your Revenue या घोषवाक्याद्वारे Filmytell प्रत्येक निर्मात्याला स्वतःचा चित्रपट जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवून त्यातून थेट उत्पन्न मिळविण्याची संधी देत आहे.
महत्त्वाची वैशिष्ट्ये : Pay-per-View डिजिटल रिलीज. जागतिक प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोच. चित्रपटाचे मालकी हक्क कायम. स्वतः भाडे दर निश्चित करण्याची. सुविधा. Android, iOS, Web Browser आणि Google TV वर उपलब्ध. पारदर्शक महसूल वाटप. साप्ताहिक व दैनिक सेटलमेंट सुविधा. फीचर फिल्म, शॉर्टफिल्म, वेब. सिरीज, माहितीपटांसाठी योग्य मंच.
वेबसाइट : www.filmytell.com⁠. ई-मेल : [email protected]. मोबाईल / WhatsApp: +91 90759 19666 येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Filmytell Digital Release Platform for Independent Filmmakers

- Advertisement -

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading