रयत समाचार | १६.७ | विशेष प्रतिनिधी
NASA हे नाव ऐकताच बहुतांश लोकांच्या मनात अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था उभी राहते. मात्र भारतात याच नावाची आणखी एक प्रतिष्ठित संस्था आहे, जी गेली जवळपास सात दशके देशातील हजारो तरुण वास्तुविशारद घडवत आहे.
ही संस्था म्हणजे National Association of Students of Architecture (NASA India).
भारतातील आर्किटेक्चर विद्यार्थ्यांसाठी कार्य करणारी NASA India ही देशातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी विद्यार्थी संघटना आहे.
1957 मध्ये रोवले गेले NASA India बीज : स्वातंत्र्योत्तर भारतात वास्तुकला शिक्षणाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने 1957 मध्ये केवळ सात आर्किटेक्चर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन NASA India ची स्थापना केली.
मुंबईतील Sir J. J. School of Architecture येथील विद्यार्थी D’Costa आणि Daji Banaji यांनी या चळवळीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
आज या संस्थेला जवळपास सात दशकांची परंपरा लाभली आहे.
आज किती मोठी आहे NASA India?
आज NASA India मध्ये भारतातील 300 पेक्षा अधिक आर्किटेक्चर महाविद्यालये सहभागी आहेत. संस्थेशी 66 हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले गेले असून ती जगातील सर्वात मोठ्या वास्तुकला विद्यार्थी संघटनांपैकी एक मानली जाते.
विद्यार्थ्यांकडून… विद्यार्थ्यांसाठी…
NASA India चे वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णपणे विद्यार्थ्यांनी चालविलेली संघटना आहे.
येथील राष्ट्रीय अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, झोनल अध्यक्ष यांसारखी सर्व पदे विद्यार्थी निवडणुकीतून भरली जातात.
संस्थेचे ब्रीदवाक्य आहे “For the Students, By the Students, Of the Students.”
केवळ स्पर्धा नव्हे, भविष्य घडविण्याची प्रयोगशाळा : NASA India केवळ डिझाइन स्पर्धा आयोजित करणारी संस्था नाही.
ती विद्यार्थ्यांना, प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याची संधी,
राष्ट्रीय स्तरावरील डिझाइन स्पर्धा, वारसा संवर्धन प्रकल्प, पर्यावरणपूरक वास्तुकला, शाश्वत विकास, शहर नियोजन,नेतृत्व विकास, उद्योग क्षेत्राशी संवाद यांसारख्या अनेक संधी उपलब्ध करून देते.
या स्पर्धा आहेत सर्वाधिक प्रतिष्ठेच्या :
दरवर्षी NASA India खालील प्रमुख राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करते. त्यात Annual NASA Convention, Annual NASA Design Competition (ANDC), HUDCO Trophy, Louis I. Kahn Trophy,
Le Corbusier Trophy, GRIHA Trophy,
Heritage Documentation Trophy या स्पर्धांमध्ये देशभरातील हजारो विद्यार्थी सहभागी होतात.
मुख्यालय कुठे?
NASA India चे मुख्यालय School of Planning and Architecture (SPA), नवी दिल्ली येथे आहे.
संस्था Societies Registration Act, 1860 अंतर्गत नोंदणीकृत असून ना नफा आणि गैर राजकीय तत्त्वावर कार्य करते.
भारताच्या स्मार्ट शहरांसाठी घडत आहेत भावी वास्तुविशारद : भारतामध्ये वेगाने वाढणारे शहरीकरण, स्मार्ट सिटी, शाश्वत विकास, हरित इमारती आणि वारसा संवर्धन या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित वास्तुविशारदांची गरज वाढत आहे.
NASA India या नव्या पिढीला केवळ पदवीधर बनवत नाही, तर सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेले डिझायनर आणि भावी शहर नियोजक घडविण्याचे काम करत आहे.
फॅक्ट बॉक्स
संस्था: National Association of Students of Architecture (NASA India)
स्थापना: 1957
मुख्यालय: School of Planning and Architecture, New Delhi
स्वरूप: ना-नफा, गैर-राजकीय विद्यार्थी संघटना
महाविद्यालये: 300+
विद्यार्थी: 66,000+
ब्रीदवाक्य: For the Students, By the Students, Of the Students
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


