समाजसंवाद | १०.७ | गौरव लष्करे
(Women Safety India) राजस्थानातील श्रीगंगानगर येथे १३ वर्षांच्या निष्पाप मुलीवर झालेले अपहरण, मानवी तस्करी आणि लैंगिक अत्याचार यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. ही फक्त एका मुलीची घटना नाही, तर आपल्या समाजाला आरसा दाखवणारी घटना आहे.
(Women Safety India) त्या चिमुरडीचा गुन्हा तरी काय होता? तिला फक्त सुरक्षितपणे जगायचे होते. ज्या वयात शाळा, खेळ, स्वप्ने आणि आई-वडिलांच्या कुशीत आनंदाने जगायचे असते, त्या वयात तिला भीती, वेदना आणि अमानुष अत्याचार सहन करावे लागले. हे ऐकून प्रत्येक आई-वडिलांचे मन भरून येते. पोलिसांनी या प्रकरणात १९ आरोपींना अटक केली आहे. गुन्हेगारांना मदत करणारी तीन हॉटेलही पाडण्यात आली आहेत. ही कारवाई महत्त्वाची आहे. पण एक प्रश्न अजूनही उभा आहे, गुन्हा झाल्यानंतर कारवाई होते, पण असे गुन्हे होऊच नयेत यासाठी आपण काय करत आहोत?
(Women Safety India) आज आपण मोठमोठ्या इमारती बांधतो, नवीन तंत्रज्ञान वापरतो आणि विकासाच्या गप्पा मारतो. पण आपल्या मुलांना चांगले संस्कार देतो का? मुलींना स्वतःचे रक्षण करायला शिकवतो, पण मुलांना प्रत्येक स्त्रीचा आदर करायला शिकवतो का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचा नेहमी सन्मान केला. त्यांनी आपल्या मावळ्यांना स्पष्ट सांगितले की कोणत्याही स्त्रीशी गैरवर्तन सहन केले जाणार नाही. म्हणूनच आज शिवरायांचे नाव घेण्यापेक्षा त्यांचे विचार आचरणात आणणे अधिक महत्त्वाचे आहे.
सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित म्हणून अनेक व्हिडिओ फिरत आहेत. मात्र पोलिसांनी स्पष्ट केले आहे की त्यापैकी काही व्हिडिओ या प्रकरणाशी संबंधित नाहीत. त्यामुळे कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी ती खरी आहे का, हे नक्की तपासा.
आज गरज फक्त गुन्हेगारांना शिक्षा देण्याची नाही, तर समाज बदलण्याची आहे. प्रत्येक मुलगी निर्भयपणे जगू शकेल, असा समाज निर्माण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारूया…
आज आपण अशा घटना वाचतो, दोन मिनिटे दुःख व्यक्त करतो आणि पुन्हा आपल्या कामाला लागतो. पण हे असेच किती दिवस चालणार? प्रत्येक वेळी एखाद्या निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यानंतरच आपण जागे होणार का?
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीला नेहमी आई-बहिणीचा मान दिला. आज त्यांचे नाव घेणारे आपण त्यांच्या विचारांनुसार वागतो का? “जय शिवराय” ही घोषणा फक्त तोंडाने नको, तर प्रत्येक स्त्रीचा आदर करणाऱ्या आपल्या वागण्यात दिसली पाहिजे.
हे ही वाचा : History | स्वातंत्र्यप्रेमी महावीर विठोजीराजे होळकरांची एवढी कृर हत्या का? स्मृतिवार्ता, संजय सोनवणी
चला, आज एक संकल्प करूया, स्त्रीचा सन्मान करू, अन्यायाविरुद्ध आवाज उठवू आणि असा समाज घडवू, जिथे प्रत्येक मुलगी निर्भयपणे, सन्मानाने आणि आनंदाने जगू शकेल. हाच छत्रपती शिवाजी महाराजांना खरा मानाचा मुजरा ठरेल.
लेखक संपर्क – 7820878252
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


