Third Gender Service 'जय हरी'च्या गजरात तृतीयपंथीयांनी भरवला मायेचा घास; सेवाभावाने जिंकली वारकऱ्यांची मने - Rayat SamacharThird Gender Service श्रीरामपूर : तृतीयपंथीयांकडून वारकऱ्यांची सेवा; मायेचा घास देत दिला माणुसकीचा संदेश

Third Gender Service ‘जय हरी’च्या गजरात तृतीयपंथीयांनी भरवला मायेचा घास; सेवाभावाने जिंकली वारकऱ्यांची मने

श्रीरामपूरमध्ये तृतीयपंथी समाजसेवा संघाचा प्रेरणादायी उपक्रम; समता, माणुसकी आणि सेवाभावाचा संदेश

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
श्रीरामपूर येथे तृतीयपंथी समाजसेवा संघाच्या वतीने आषाढी वारीतील वारकऱ्यांना प्रेमाने नाश्ता व फराळाचे वाटप करण्यात आलेSubEditor | Dipak Shirasath

श्रीरामपूर | १०.७ | सलीमखान पठाण

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी राज्यभर विविध ठिकाणी अन्नदान आणि फराळाचे उपक्रम राबवले जात आहेत. या सेवाभावाच्या परंपरेत श्रीरामपूर शहरातील तृतीयपंथी समाजसेवा संघाने केलेले सेवाकार्य (Third Gender Service) विशेष लक्षवेधी ठरले. समाजाकडून अनेकदा उपेक्षा सहन करणाऱ्या तृतीयपंथीयांनी हजारो वारकऱ्यांना प्रेमाने नाश्ता व फराळाचे वाटप करून माणुसकीचा खरा संदेश दिला.

पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या मानाच्या निवृत्ती महाराज पालखी सोहळ्याचे श्रीरामपूरमध्ये आगमन होताच तृतीयपंथी समाजसेवा संघाच्या सदस्यांनी वारकऱ्यांचे आत्मीयतेने स्वागत केले. (Third Gender Service) “जय हरी माऊली” आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या गजरात वारकऱ्यांना अल्पोपहार देत त्यांनी सेवेलाच ईश्वरभक्ती मानणाऱ्या वारकरी परंपरेला साजेशी कृती केली.

समाज अनेकदा तृतीयपंथीयांकडे वेगळ्या नजरेने पाहतो. मात्र या (Third Gender Service) उपक्रमातून त्यांनी आपणही समाजाचा अविभाज्य भाग असून संवेदनशीलता, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नागरिक आहोत, हे कृतीतून सिद्ध केले.

माणुसकीला लिंग, जात किंवा धर्माचे बंधन नसते; ती प्रेम, करुणा आणि सेवेतून व्यक्त होते, याची जाणीव या उपक्रमाने करून दिली.

या सेवेने भारावलेल्या वारकऱ्यांनी तृतीयपंथी समाजाचे मनापासून आभार मानत त्यांच्या सेवाभावाचे कौतुक केले. विठ्ठलभक्तांच्या सेवेतून समाजात समतेचा आणि सकारात्मक बदलाचा संदेश देणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.

हे ही वाचा : योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा

दिशा शेख म्हणाल्या, “पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांची सेवा आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून करत आहोत. या वारकऱ्यांमध्ये आम्हाला आमचा पांडुरंग दिसतो. त्यांच्या सेवेतून आत्मिक समाधान मिळते. ही सेवा आम्ही परमार्थ मानून दरवर्षी करतो.”

- Advertisement -

आम्हालाही समाजाचा एक भाग म्हणून माणुसकी जपायची आहे. वारकरी हे विठ्ठलाचे भक्त आहेत. त्यांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य आहे. भुकेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आशीर्वाद हीच आमच्या सेवाकार्याची खरी कमाई आहे. विठ्ठलाच्या चरणी ही छोटीशी सेवा अर्पण करताना आम्हालाही आत्मिक समाधान लाभले. – पिंकी हाजी, अध्यक्षा, तृतीयपंथी समाजसेवा संघ 

History | स्वातंत्र्यप्रेमी महावीर विठोजीराजे होळकरांची एवढी कृर हत्या का? स्मृतिवार्ता, संजय सोनवणी

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading