Fruit Crop Insurance | 14 जुलैपूर्वी फळपीक विमा काढा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन - Rayat SamacharFruit Crop Insurance १४ जुलैपूर्वी फळपीक विमा काढा; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Fruit Crop Insurance | 14 जुलैपूर्वी फळपीक विमा काढा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

'फसल विमा महिना' उपक्रमाला प्रारंभ; यंदा प्रथमच योजनेत हळदीचा समावेश

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read

अहमदनगर | ९.७ | नरहरी शहाणे

(Fruit Crop Insurance) अहिल्यानगर जिल्ह्यात १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत भारतीय कृषी विमा कंपनी (AIC) मार्फत ‘फसल विमा महिना’ साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ अहिल्यानगर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी तंत्र अधिकारी दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

- Advertisement -

(Fruit Crop Insurance) पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना (मृग बहार २०२६) अंतर्गत सहभागी होण्यासाठी १४ जुलै २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभाग तसेच भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी गणेश सानप यांनी केले आहे.

(Fruit Crop Insurance) या योजनेत अहिल्यानगर जिल्ह्यातील डाळिंब, संत्रा, मोसंबी, सीताफळ, लिंबू, पेरू, चिकू या प्रमुख फळपिकांचा समावेश असून, यंदा प्रथमच हळद या पिकाचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी विमा काढून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या संभाव्य आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

‘फसल विमा महिना’ निमित्त जिल्हाभर जनजागृती अभियान राबविण्यात येत असून, भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी गावोगावी भेटी देत ‘फसल विमा पाठशाळा’ आयोजित करत आहेत. या माध्यमातून योजनेची पात्रता, नोंदणी प्रक्रिया, विम्याचे संरक्षण आणि योजनेचे महत्त्व याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.

 

यावेळी गणेश सानप म्हणाले, हवामानातील सातत्याने होत असलेल्या बदलांचा फळपिकांवर मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षा कवच ठरते. सर्व पात्र फळ उत्पादकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता १४ जुलैपूर्वी नोंदणी करून विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा.

 

- Advertisement -

Image Alt Text: Ahilyanagar Fruit Crop Insurance Scheme 2026 Awareness Program


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading