Shirish Modak | प्रा. शिरीष मोडक यांचे निधन; शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रावर शोककळा - Rayat Samacharप्रा. शिरीष मोडक यांचे निधन; अहमदनगरच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रावर शोककळा

Shirish Modak | प्रा. शिरीष मोडक यांचे निधन; शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रावर शोककळा

हिंद सेवा मंडळ आणि जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष, शिक्षण व वाचन संस्कृतीच्या चळवळीतील सक्रिय व्यक्तिमत्त्व हरपले

rayatsamachar
1 Min Read
प्रा. शिरीष दामोदर मोडक यांच्या निधनाने अहमदनगरच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळSubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | २२ जून | रयत समाचार

अहमदनगर येथील हिंद सेवा मंडळ तसेच जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष दामोदर मोडक (वय ७२) Shirish Modak यांचे आज (ता. २२ जून) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने अहमदनगरच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वाचन संस्कृतीच्या क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रा. Shirish Modak यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य करत असतानाच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग नोंदवला. हिंद सेवा मंडळ आणि जिल्हा वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचा प्रसार, सामाजिक बांधिलकी आणि विविध लोकहिताचे उपक्रम राबविण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.

Shirish Modak यांच्यावर आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी प्रसन्नप्रभा मोडक, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई तसेच नातवंडे असा परिवार आहे.
प्रा. शिरीष मोडक यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading