पुणे | १८ जून | रयत समाचार
(Social) पुणे महापालिकेने शहरात कायद्यानुसार वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन न केल्यामुळे पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमुळे पुण्यातील पर्यावरण व्यवस्थापनाचा प्रश्न आता न्यायालयाच्या दारात पोहोचला आहे.
(Social) राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता बहिरट आणि सामाजिक कार्यकर्ते पुष्कर कुलकर्णी यांनी संयुक्तपणे ही याचिका दाखल केली असून, त्यांच्या वतीने अधिवक्ता सत्या मुळे न्यायालयात बाजू मांडत आहेत. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत याचिकेची माहिती देण्यात आली.
याचिकेत पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
(Social) महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व जतन अधिनियमातील तरतुदीनुसार प्रत्येक महापालिकेत वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. मात्र, लोकप्रतिनिधी नसताना या समितीचे अधिकार आयुक्तांकडे देण्यात आले आणि लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतरही ते अधिकार आयुक्तांकडेच कायम ठेवण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
याचिकाकर्त्यांच्या मते, या परिस्थितीमुळे वृक्ष संरक्षणासंदर्भातील निर्णय प्रक्रियेत लोकप्रतिनिधींचा सहभाग राहिलेला नाही आणि पर्यावरण संरक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



