Education | यतीमखाना झकेरिया आघाडी प्राथमिक विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न - Rayat Samachar
Ad imageAd image

Education | यतीमखाना झकेरिया आघाडी प्राथमिक विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | १८.६ | रयत समाचार

(Education) अहमदनगर यतीमखाना अँड बोर्डिंग संचलित झकेरिया आघाडी प्राथमिक शाळा येथे शाळा प्रवेशोत्सव क्र. २ व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

(Education) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शमीम पठाण उपस्थित होत्या, तर जाकीरभाई वायरमन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नवागत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच गणवेश, वह्या व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

(Education) यावेळी शिक्षक अन्सार सर यांनी शिक्षण, शिस्त व नैतिक मूल्यांचे महत्त्व विद्यार्थी व पालकांना पटवून दिले. प्रमुख पाहुणे जाकीरभाई वायरममन यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, चांगले संस्कार व कठोर परिश्रमाचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सना पालकर यांनी प्रास्ताविक ईशा तांबोळी प्रास्ताविक यांनी तर आभार प्रदर्शन अफशान शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षिका काजल व शिक्षिका झेबा यांच्यासह शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading