Ad imageAd image

Education | ‘रयत’च्या स्थानिक स्कूलकमिटीवर कवयित्री स्वाती पाटील यांची पुन्हा निवड

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

कर्जत | १६.६ | रयत समाचार

(Education) रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामार्फत सौ. सो.ना. सोनमाळी कन्या विद्यामंदिर, कर्जत येथील स्थानिक स्कूल कमिटीच्या सदस्यपदी कवयित्री स्वाती गणेश पाटील यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. संस्थेने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत ता. १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२९ या कालावधीसाठी ही जबाबदारी सोपविली.

(Education) या निवडीबाबत रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी यांनी अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी शाळेच्या प्रगतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सक्रिय योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

(Education) स्वाती पाटील यांनी संस्थेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीसह शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध राहून कार्य करणार आहे, अशी भावना व्यक्त केली.
रयत शिक्षण संस्थेच्या कार्यपद्धतीनुसार स्थानिक स्कूल कमिटी सदस्यांना शाळेच्या प्रशासन, विकास आणि विविध उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी लागते. या पार्श्वभूमीवर स्वाती पाटील यांची पुनर्निवड ही त्यांच्या कार्याची मिळालेली पावती मानली जात आहे.
संस्थेच्या या सन्मानामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Cultural Politics | एकात्मिक मानववाद, ढोंगाचा बाजार आणि पंडीत दीनदयाळ यांची फसवणूक 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading