Ad imageAd image

Education | प्रोजेक्ट उन्नती : 30 तासांचे समुपदेशन प्रशिक्षण संपन्न

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | ११.६ | गुरुदत्त वाकदेकर

(Education) सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट उन्नती-२ ; सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्किल डेव्हलपमेंट ऑफ वूमेन स्टुडंट्स’ अंतर्गत श्रीमती मणिबेन एम.पी. शाह कला व वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, माटुंगा येथील मानसशास्त्र विभागात ३० तासांचे ‘पर्सन-सेंटर्ड थेरपी प्रशिक्षण कार्यक्रम’ यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.

(Education) समुपदेशन मानसशास्त्रात विशेषीकरण करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थिनींसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्ल रॉजर्स यांच्या मानवतावादी दृष्टिकोनावर आधारित प्रत्यक्ष समुपदेशन कौशल्यांचा विकास करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. मानसिक आरोग्य क्षेत्रातील व्यावहारिक कौशल्ये विकसित करणे हा यामागील प्रमुख हेतू होता.

(Education) प्रशिक्षण सत्रात ‘सुख बाय एस.एच.एम.’च्या संस्थापिका श्वेता मंगनानी यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सत्र घेतले. कार्यक्रमात संवादात्मक व्याख्याने, अनुभवाधारित उपक्रम, भूमिकानाट्य, आत्मपरिक्षण सराव, केस स्टडीज आणि पर्यवेक्षित प्रात्यक्षिक सत्रांचा समावेश करण्यात आला.

हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ मुंबई क्वीन्स नेकलेस तसेच दलाल अँड ब्रोचा स्टॉक ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सीएसआर सहाय्यातून राबविण्यात आला. ‘उन्नती-१’ नंतर मिळालेल्या सातत्यपूर्ण सहकार्यामुळे कौशल्यविकास कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य झाले आहे.

या प्रशिक्षण मालिकेची संकल्पना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.अर्चना पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आली. महिला विद्यार्थिनींसाठी कौशल्याधारित आणि अनुभवाधारित शिक्षणावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे.

प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थिनींना सहानुभूती, निरपेक्ष सकारात्मक स्वीकार, चिकित्सकीय संवाद, सक्रिय ऐकणे, आत्म-जागरूकता, भावनिक बुद्धिमत्ता आणि नैतिक समुपदेशन प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या व्यावसायिक कौशल्यांचा विकास झाला असून त्यांना समुपदेशन, मानसिक आरोग्य सेवा, शिक्षण, स्वयंसेवी संस्था, रुग्णालये आणि पुनर्वसन केंद्रे या क्षेत्रांतील करिअरसाठी तयारी मिळाली आहे.

या उपक्रमाचे आयोजन प्रकल्प संचालक प्रो.डॉ. माला पांडुरंग आणि समन्वयक दत्तात्रय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

‘प्रोजेक्ट उन्नती-२’ अंतर्गत हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून कौशल्य विकास आणि रोजगारक्षम शिक्षणाच्या दिशेने संस्थेच्या प्रयत्नांना अधिक गती मिळाली.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading