कल्याण | ३१.५ | रयत समाचार
(Social) शरदचंद्र नागेश सहकारी पतसंस्था मर्यादित, राजुरी या संस्थेच्या कल्याण येथील सोळाव्या शाखेचे उद्घाटन हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास ह.भ.प. संदीप महाराज डुंबरे, संस्थेचे अध्यक्ष एम.डी. घंगाळे, आमदार सुलभा गायकवाड, नगरसेवक निलेश शिंदे, सन्मित्र महेंद्र हाडोळे यांच्यासह पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, ठेवीदार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Social) यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी संत तुकाराम महाराजांच्या “जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ।।” या अभंगाचे निरूपण करत बचतीचे महत्त्व विशद केले. आर्थिक शिस्त, बचतीची सवय आणि योग्य व्यवहार यामुळेच समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
(Social) त्यांच्या प्रभावी निरूपणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नव्या शाखेमुळे परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या आर्थिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.

