World news | मॉस्कोत आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी परिषदेला प्रारंभ; सीपीआयचे डी.राजा आणि रामकृष्ण पांडा भारताचे प्रतिनिधित्व करत सहभागी

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मॉस्को | २५.५ | रयत समाचार

(World news) रशियाची राजधानी मॉस्को येथे The Struggle Against International Terrorism, Arbitrariness and Aggression: For Peace and Security या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय अँटी-फॅसिस्ट फोरम परिषदेला उत्साहात प्रारंभ झाला. या परिषदेचे उद्घाटन रशियन फेडरेशनच्या कम्युनिस्ट पक्षाचे (CPRF) सरचिटणीस गेन्नादी झ्यूगानोव्ह यांच्या हस्ते करण्यात आले.

World news

(World news) जगभरातील विविध देशांतील प्रतिनिधी, राजकीय नेते, शांतता व लोकशाही चळवळीतील कार्यकर्ते या परिषदेत सहभागी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय दहशतवाद, युद्धजन्य परिस्थिती, साम्राज्यवादी हस्तक्षेप आणि जागतिक शांततेसाठी एकत्रित लढा या मुद्द्यांवर परिषदेत सखोल चर्चा होत आहे.

World news

(World news) भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पक्षाचे सरचिटणीस डी. राजा आणि राष्ट्रीय सचिव रामकृष्ण पांडा हे परिषदेत सहभागी झाले आहेत. भारताच्या वतीने त्यांनी जागतिक शांतता, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि दहशतवादाविरोधातील संयुक्त लढ्याबाबत भूमिका मांडली.
परिषदेदरम्यान विविध देशांतील प्रतिनिधींमध्ये द्विपक्षीय चर्चाही पार पडत असून जागतिक पातळीवरील सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. मॉस्को येथे आयोजित या परिषदेकडे आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading