Press | जगातील सर्वात मुक्त माध्यमांना उत्तर का नाही?; ओस्लोमध्ये मोदींना नॉर्वेजियन पत्रकाराचा थेट सवाल

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

ओस्लो, वृत्तसंस्था |१९.५ | रयत समाचार

(Press) सोमवारी ता.१८ मे नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक पार पडली. व्यापार, हरित ऊर्जा, आर्क्टिक सहकार्य आणि जागतिक घडामोडींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, या बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत माध्यम स्वातंत्र्याचा मुद्दा अचानक केंद्रस्थानी आला.

(Press) पत्रकार परिषद संपल्यानंतर पीएम मोदी पोडियमवरून निघत असताना नॉर्वेजियन पत्रकार हेल लिंग यांनी मोठ्याने प्रश्न विचारला, पंतप्रधान मोदी, तुम्ही जगातील सर्वात मुक्त माध्यमांच्या काही प्रश्नांची उत्तरे का देत नाही? या प्रश्नामुळे काही क्षण सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

(Press) यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या विशेष प्रेस ब्रीफिंगमध्येही हा मुद्दा पुन्हा उपस्थित करण्यात आला. नॉर्वेजियन पत्रकारांनी भारतातील माध्यम स्वातंत्र्य, पत्रकारांवरील दबाव आणि आंतरराष्ट्रीय निर्देशांकांमधील भारताच्या घसरलेल्या क्रमांकाबाबत भारतीय अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले.
मात्र, भारताचे परराष्ट्र सचिव सीबी जॉर्ज यांनी या दाव्यांना ठामपणे फेटाळून लावत भारतात स्वतंत्र आणि सक्रिय माध्यम व्यवस्था कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. भारतामध्ये हजारो वृत्तसंस्था, टीव्ही चॅनेल्स, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि स्वतंत्र पत्रकार सक्रियपणे काम करत आहेत. भारतीय लोकशाहीमध्ये माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे त्यांनी सांगितले.
या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली असून, काहींनी पत्रकाराच्या धाडसाचे कौतुक केले तर काहींनी हा प्रकार राजनैतिक शिष्टाचाराच्या विरोधात असल्याची टीका केली.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

TAGGED:
Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading