मुंबई | २२.४ | रयत समाचार
(Politics) छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अंमलदार मनोज बोढरे यांच्या पत्नी निकिता बोढरे यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेला ‘कमळाचा’ अत्यंत सुंदर आणि आकर्षक एम्ब्रॉयडरी टॉवेल आज मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात सुधीर मुनगंटीवार यांना सप्रेम भेट दिला.
(Politics) याबाबत माहिती देताना रा.स्व. संघाच्या भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ही भेट केवळ एक वस्तू नसून त्यामागे आपुलकी, स्नेह आणि जिव्हाळ्याची भावना दडलेली आहे. हस्तकलेतून व्यक्त झालेली ही भावना खरोखरच मनस्पर्शी आहे.
(Politics) ते पुढे म्हणाले, अशा आगळ्यावेगळ्या आणि हृदयस्पर्शी भेटीमुळे सामाजिक नातेसंबंध अधिक दृढ होतात. या सुंदर भेटीसाठी त्यांनी निकिता बोढरे यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी स्वत: सोशल मिडीयावर टॉवेलचा फोटो शेअर करून ही गोष्ट कळविली.
Biodiversity | अहिल्यानगरचा ‘किंगफिशर’ आता पाण्याच्या बाटलीवर; ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर
Contents
मुंबई | २२.४ | रयत समाचार(Politics) छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अंमलदार मनोज बोढरे यांच्या पत्नी निकिता बोढरे यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेला ‘कमळाचा’ अत्यंत सुंदर आणि आकर्षक एम्ब्रॉयडरी टॉवेल आज मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात सुधीर मुनगंटीवार यांना सप्रेम भेट दिला.(Politics) याबाबत माहिती देताना रा.स्व. संघाच्या भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ही भेट केवळ एक वस्तू नसून त्यामागे आपुलकी, स्नेह आणि जिव्हाळ्याची भावना दडलेली आहे. हस्तकलेतून व्यक्त झालेली ही भावना खरोखरच मनस्पर्शी आहे.(Politics) ते पुढे म्हणाले, अशा आगळ्यावेगळ्या आणि हृदयस्पर्शी भेटीमुळे सामाजिक नातेसंबंध अधिक दृढ होतात. या सुंदर भेटीसाठी त्यांनी निकिता बोढरे यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी स्वत: सोशल मिडीयावर टॉवेलचा फोटो शेअर करून ही गोष्ट कळविली.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
