Crime | व्हिएसआर विमानाचा टेकऑफ पूर्वीच बिघाड; आमदार रोहीत पवार यांचा गंभीर आरोप - Rayat Samachar

Crime | व्हिएसआर विमानाचा टेकऑफ पूर्वीच बिघाड; आमदार रोहीत पवार यांचा गंभीर आरोप

rayatsamachar
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नवी दिल्ली | रयत समाचार

(Crime) व्हिएसआर कंपनीची विमाने निकृष्ट आणि प्रवाशांसाठी धोकादायक असल्याचा आरोप पुन्हा एकदा समोर आला आहे. व्हिएसआर कंपनीचे VT-VRR हे विमान दिल्लीहून दुबईकडे उड्डाणासाठी सज्ज असताना टेकऑफपूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाण रद्द करण्यात आले. विमानाच्या पंखांतील फ्लॅप प्रणालीत दोष निर्माण झाल्याने विमान उड्डाण घेऊ शकले नाही, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

(Crime) आमदार पवार यांनी या घटनेवरून व्हिएसआर कंपनीच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मी आधीपासूनच व्हिएसआर कंपनीची विमाने अत्यंत भंगार आणि धोकादायक असल्याचे पुराव्यासह सांगत आलो आहे. आजची घटना त्या आरोपांना पुन्हा अधोरेखित करते, असे ते म्हणाले.

(Crime) पुढे बोलताना त्यांनी अजित पवार यांच्या अपघाताचा संदर्भ देत म्हटले की, या विमानाचा मॉडेल Learjet 45 XR असून, हाच प्रकार अजितदादांच्या अपघातातही होता. त्या अपघातानंतर व्हिएसआरची चार Learjet विमाने ग्राउंड करण्यात आली होती. मग VT-VRR हे विमान ग्राउंड का करण्यात आले नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यासोबतच त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनावरही निशाणा साधत, कदाचित या विमानाचा मालक कुणीतरी अतिशय प्रभावशाली व्यक्ती असावी. त्यामुळेच त्यावर कारवाई झाली नाही का? या गंभीर बाबीकडे संबंधित यंत्रणा लक्ष देणार का? आणि व्हिएसआर कंपनीच्या मालकाकडे यावर बोलण्याची हिंमत आहे का? असे प्रश्न उपस्थित केले.
या घटनेमुळे विमान सुरक्षा आणि देखभाल प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यासह संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading