By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Rayat SamacharRayat Samachar
Reading: Public issue | वैभवशाली माळीवाडा वेस वाचविण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; ‘भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याची’ जबाबदारी
Share
Notification Show More
Font ResizerAa
Font ResizerAa
Rayat SamacharRayat Samachar
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Rayat Samachar > Breaking > Public issue | वैभवशाली माळीवाडा वेस वाचविण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; ‘भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याची’ जबाबदारी
BreakingLatestअहमदनगरआवाहनइतिहासकायदाजिल्हा पोलिस अधीक्षकजिल्हाधिकारीताज्या बातम्यासांस्कृतिक राजकारण

Public issue | वैभवशाली माळीवाडा वेस वाचविण्यासाठी पुरातत्त्व विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; ‘भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याची’ जबाबदारी

रयत समाचार वृत्तसेवा
Last updated: 11.04.2026 7:32 pm
By रयत समाचार वृत्तसेवा 2 Min Read
Share
SubEditor | Dipak Shirasath
SHARE

अहमदनगर | ११.४ | रयत समाचार

(Public issue) शहराच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या माळीवाडा वेशीच्या संरक्षणासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) पुढे सरसावले आहे. या संदर्भात अधीक्षक पुरातत्त्वविद डॉ. शिवकुमार भगत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यामधे बाळासाहेब बोराटे यांचा संदर्भ दिला आहे.

(Public issue) ऐतिहासिक वारसा धोक्यात : पत्रानुसार, माळीवाडा वेशीचे बांधकाम इ.स. १६३१ मध्ये निजामशाही सरदार सर्जेखान यांनी केले होते. ही वेस शहराच्या तटबंदीत असलेल्या अकरा ऐतिहासिक दरवाजांपैकी एक असून अहमदनगरच्या समृद्ध इतिहासाचे महत्त्वपूर्ण प्रतीक मानली जाते. तसेच माळीवाड्याचे नाक समजले जाते. माळीवाड्याची ओळख म्हणजे ही वेस असून ती स्वाभिमानाची खूण आहे.

(Public issue) अतिक्रमण हटविण्याचे आदेश : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने यापूर्वीच २०११ मध्ये महानगरपालिकेला स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, माळीवाडा व दिल्ली दरवाजाचे नुकसान होऊ नये. तसेच या परिसरातील अतिक्रमण हटवून दरवाजांचे संवर्धन करावे, असेही नमूद करण्यात आले होते.
संवर्धनासाठी प्रस्तावाची मागणी : ताज्या पत्रात जिल्हाधिकाऱ्यांना विविध बाबींसाठी निर्देश देण्यात आलेत. माळीवाडा वेस परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटविणे. वेशीचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी प्रस्ताव राज्य पुरातत्त्व विभागाकडे पाठविणे. ऐतिहासिक वास्तू ‘भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याची’ जबाबदारी पार पाडणे.
वारसा जपण्याची गरज : शहरातील ऐतिहासिक वास्तूंवर वाढत्या अतिक्रमणामुळे वारसा धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून माळीवाडा वेशीचे जतन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : महात्मा फुले समग्र वाड्मय PDF येथे उपलब्ध आहे

Contents
अहमदनगर | ११.४ | रयत समाचार(Public issue) शहराच्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या माळीवाडा वेशीच्या संरक्षणासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) पुढे सरसावले आहे. या संदर्भात अधीक्षक पुरातत्त्वविद डॉ. शिवकुमार भगत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यामधे बाळासाहेब बोराटे यांचा संदर्भ दिला आहे.(Public issue) ऐतिहासिक वारसा धोक्यात : पत्रानुसार, माळीवाडा वेशीचे बांधकाम इ.स. १६३१ मध्ये निजामशाही सरदार सर्जेखान यांनी केले होते. ही वेस शहराच्या तटबंदीत असलेल्या अकरा ऐतिहासिक दरवाजांपैकी एक असून अहमदनगरच्या समृद्ध इतिहासाचे महत्त्वपूर्ण प्रतीक मानली जाते. तसेच माळीवाड्याचे नाक समजले जाते. माळीवाड्याची ओळख म्हणजे ही वेस असून ती स्वाभिमानाची खूण आहे.(Public issue) अतिक्रमण हटविण्याचे आदेश : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने यापूर्वीच २०११ मध्ये महानगरपालिकेला स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, माळीवाडा व दिल्ली दरवाजाचे नुकसान होऊ नये. तसेच या परिसरातील अतिक्रमण हटवून दरवाजांचे संवर्धन करावे, असेही नमूद करण्यात आले होते.संवर्धनासाठी प्रस्तावाची मागणी : ताज्या पत्रात जिल्हाधिकाऱ्यांना विविध बाबींसाठी निर्देश देण्यात आलेत. माळीवाडा वेस परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटविणे. वेशीचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी प्रस्ताव राज्य पुरातत्त्व विभागाकडे पाठविणे. ऐतिहासिक वास्तू ‘भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवण्याची’ जबाबदारी पार पाडणे.वारसा जपण्याची गरज : शहरातील ऐतिहासिक वास्तूंवर वाढत्या अतिक्रमणामुळे वारसा धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून माळीवाडा वेशीचे जतन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक

TAGGED:asipublic issueअहिल्यानगरभारतीय पुरातत्व खातेमाळीवाडा वेस
Share This Article
Facebook Twitter Email Print
Previous Article History | फुले यांचा कन्या शिक्षण वारसा धोक्यात; भिंगारमधील ऐतिहासिक ‘महात्मा फुलेंची शाळा’ वाचविण्यासाठी जनांदोलनाची हाक
Next Article Literature | संकटाच्या काळात साहित्यच देतो आधार- रश्मी शुक्ला; ‘ग्रंथदिंडी’ने महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचा दिमाखदार प्रारंभ
BREAKING ताज्या बातम्या येथे आपोआप स्क्रोल होतील...
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Join Us!

Subscribe to our newsletter and never miss our latest news, podcasts etc..

[mc4wp_form]
Zero spam, Unsubscribe at any time.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?