कोलकाता | ३१.३ | रयत समाचार
(Art) चित्रपट निर्माते आणि डॉक्युमेंटरी दिग्दर्शकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली असून, ९ वा साऊथ एशियन शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल (SASFF) साठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख आजच म्हणजे ३१ मार्च २०२६ आहे. हा प्रतिष्ठित महोत्सव ८ ते १४ जून २०२६ दरम्यान कोलकाता येथे आयोजित करण्यात येणार आहे.
(Art) महोत्सवात १ जानेवारी २०२३ नंतर तयार झालेल्या लघुपट व माहितीपटांना सहभागाची संधी दिली जात आहे. दक्षिण आशियाई देशांसह जगभरातील चित्रपट निर्मात्यांसाठी विविध स्पर्धा आणि नॉनकॉम्पिटिशन विभाग उपलब्ध आहेत.
(Art) यातील प्रमुख विभाग असे आहेत. (A) South Asian Films. शॉर्ट फिक्शन (स्पर्धा) – कमाल ४० मिनिटे. शॉर्ट फिक्शन (पॅनोरामा – स्पर्धेबाह्य) – कमाल ४० मिनिटे. डॉक्युमेंटरी (स्पर्धा) – कमाल ६० मिनिटे. डॉक्युमेंटरी (पॅनोरामा – स्पर्धेबाह्य) – कमाल ६० मिनिटे.
(B) International Window. शॉर्ट फिक्शन (स्पर्धेबाह्य) – कमाल ४० मिनिटे. डॉक्युमेंटरी (स्पर्धेबाह्य) – कमाल ६० मिनिटे.
आकर्षक पुरस्कार : सत्यजित रे गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ पुरस्कार – सर्वोत्तम माहितीपटासाठी. ऋत्विक घटक गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉन्झ पुरस्कार – सर्वोत्तम लघुपटासाठी.
या महोत्सवाचे आयोजन फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया (Eastern Region) यांच्या वतीने करण्यात येत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त या फेस्टिव्हलमध्ये सहभाग ही चित्रपट निर्मात्यांसाठी मोठी संधी मानली जाते.
नोंदणी व अधिक माहिती सबमिशन लिंक : https://filmfreeway.com/sasff अधिकृत संकेतस्थळ : https://sasff.in/
अंतिम मुदत: ३१ मार्च २०२६ आजच.
नवोदित व अनुभवी चित्रपट निर्मात्यांनी ही संधी गमावू नये, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
