Social | संवादाची बीजं रुजवुन दुराव्याच्या भिंती कोसळतील, आपुलकीचा पूल उभा राहील- लाटकर; ‘नब्ज़’ ईद विशेषांकाचे प्रकाशन

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | २९.३ | रयत समाचार

(Social) ‘नब्ज़’चे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वयंस्फुर्तीने प्रकाशन समारंभ झाले, हीच यशाची पावती असून राज्यभरातील विविध संस्था संघटनांनी पुढाकार घेत हे कार्यक्रम केले. नगर शहरातही प्रकाशन होत आहे ही नब्ज़ टीमसाठी सकारात्मक गोष्ट आहे. आपण प्रेमाची भाषा वापरून समाज सकारात्मकतेकडे नेवू, असे प्रतिपादन संपादिका मिनाज लाटकर यांनी केले. ता.२८ रोजी रहेमत सुलतान हॉल येथे सकल भारतीय समाज यांच्या वतीने नब्ज़ ईद विशेषांकाचा प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या.

(Social) लाटकर पुढे म्हणाल्या, ​​आज आपला समाज धर्म, द्वेष आणि गैरसमज यांच्या गढूळ वातावरणात अडकला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, बहुसंख्यांक समाज आणि मुस्लिम समाज यांच्यात संवादाचा अभाव आहे. आपण शेजारी असूनही, एकमेकांच्या भाषा, संस्कृती, खानपान आणि जगण्याबद्दल अनभिज्ञ आहोत. ​’दाढी टोपीवाला’ या मर्यादित ओळखीपलीकडे जाऊन, मुस्लिम समाजातला चांगुलपणा, साहित्य आणि प्रगतीशील विचार यांची खरी ओळख बहुसंख्यांक समाजाला करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे ‘नब्ज़’ असल्याचे सांगत. आम्ही या दोन घटकांमध्ये संवादाची बीजं रुजवू पाहतोय, ज्यामुळे दुराव्याच्या भिंती कोसळतील आणि आपुलकीचा पूल उभा राहील.

(Social) संपादिका मिनाज लाटकर यांचा सत्कार युनूसभाई तांबटकर आणि आनंद शितोळे यांच्या हस्ते तर ‘नब्ज़’ ईद विशेषांकाचे प्रकाशन सोनाली देवढे-शिंदे, संध्या मेढे, मरयम सय्यद, मिनाज लाटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक एस.एम.जोशी फौंडेशनचे अध्यक्ष साथी सुभाष वारे यांनी केले. नब्ज़ आणि मिनाज लाटकर यांचा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला तसेच येत्या काळात त्याची असलेली गरज अधोरेखित केली. यावेळी सोनाली देवढे- शिंदे यांनी मनोगत व्यक्त येत्या काळात ”नब्ज़’ घराघरात वाचला जाईल यासाठी सर्वजण प्रयत्नशिल राह, असे आश्वासन दिले.
‘नब्ज़’चे लेखक समीर गायकवाड यांनी आपला ‘प्रतिगामी ते पुरोगामी’ प्रवास उलगडून सांगत येत्या काळात आपल्याला सजगपणे बेधडक काम करावे लागेल, असे सांगितले.
कार्यक्रमास अशोक सब्बन, प्रजापती, असिफखान दुलेखान, आबिद खान, इंजि. अभिजित एकनाथ वाघ, डॉ. प्रशांत शिंदे, प्रा.मुदस्सर सय्यद, प्रा. बापू चंदनशिवे, प्रा.अतुल चौरपगार, तुषार सोनवणे, पंकज गुंदेचा, ॲड.विद्या शिंदे-जाधव, रूतुजा शिंदे, फिरोज शेख, डॉ.परवेज अशरफी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ.प्रा.डॉ. महेबुब सय्यद यांनी केले तर आभार रयत समाचारचे संपादक भैरवनाथ वाकळे यांनी मानले.

हे ही पहा : नब्ज़ ईद विशेषांक प्रकाशन सोहळा LIVE पहा 

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading