अहमदनगर | २९.३ | रयत समाचार
(Education) जिल्ह्यातील ॲड. साक्षी आदिनाथ जाधव यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करत नॅशनल लॉ स्कूल, मुंबई (MNLU) येथून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात एलएलएम परीक्षा विशेष योग्यता श्रेणीसह उत्तीर्ण होत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.
(Education) विद्यापीठाचा भव्य पदवीदान समारंभ शनिवारी ता.२८ मार्च रोजी मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथे पार पडला. या समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अलोक आराधे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते साक्षी जाधव यांना पदवी प्रदान करण्यात आली, हा क्षण त्यांच्या कुटुंबासाठी अभिमानाचा ठरला.
(Education) साक्षी जाधव या सध्या नगर जिल्हा न्यायालयात ज्येष्ठ विधीज्ञ परिमल फळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनिअरशीप करत असून, त्यांनी अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. त्यांच्या यशामागे सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध मेहनत आणि कुटुंबीयांचा पाठिंबा असल्याचे दिसून येते. दैनिक नमो संघराज वृत्तपत्राचे संपादक आदिनाथ तथा बाबा जाधव यांच्या त्या कन्या आहेत.
साक्षी यांच्या या यशामुळे जाधव परिवारात आनंदाचे वातावरण असून, रयत समाचार परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. साक्षी जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
