Politics | कै. अजित पवार अपघातानंतर नवे नियम, पण अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह; आ. रोहित पवारांचा आरोप

डीजीसीए जागी झाली की दिखावा?

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | २९.३ | रयत समाचार

(Politics) अजितदादांच्या दुर्दैवी अपघातानंतर विमान सुरक्षेबाबत अनेक गंभीर मुद्दे समोर आले असून, व्हिएसआरसारख्या कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचेही उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) ने महत्त्वाच्या व्यक्तींच्या (VIP) प्रवासासाठी नव्या सुरक्षा गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. मात्र, या नव्या नियमांवरच आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

(Politics) २०१४ च्या तुलनेत २०२६ मधील गाईडलाईन्स अधिक विस्तृत असल्या, तरी त्या केवळ जुन्याच नियमांमध्ये किरकोळ बदल करून तयार केल्या आहेत, असा आरोप कर्जतलजामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला.

(Politics) रोहित पवार म्हणाले, YSR रेड्डी यांच्या अपघातानंतर २०१४ मध्येही अशाच प्रकारच्या गाईडलाईन्स जाहीर झाल्या होत्या. मात्र, अधिकाऱ्यांचे आणि विमान कंपन्यांचे हितसंबंध आड आल्यामुळे त्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे अपघात रोखले गेले नाहीत.
ते पुढे म्हणाले, अजितदादांसारख्या लोकनेत्याचा जीव गमवावा लागल्यानंतर DGCA ला जाग आली आहे. परंतु केवळ कागदोपत्री बदल करून उपयोग नाही. VSR कंपनी, Accountable Manager आणि संबंधित अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे.
पवार यांनी स्पष्ट मागणी करत सांगितले, जुन्या आणि नव्या दोन्ही गाईडलाईन्समध्ये ‘Action for Non-Compliance’ स्पष्टपणे नमूद आहे. त्यानुसार संबंधित कंपनीचा NSOP रद्द करावा आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा या नव्या गाईडलाईन्सही फक्त दिखावा ठरतील.
दरम्यान, DGCA ने नव्या गाईडलाईन्समध्ये VIP उड्डाणांदरम्यान सुरक्षा तपासणी, समन्वय आणि जबाबदाऱ्या अधिक स्पष्ट केल्या आहेत. मात्र, या नियमांची प्रत्यक्षात अंमलबजावणी कितपत होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नियम नव्हे, अंमलबजावणीच खरी कसोटी. अन्यथा प्रत्येक अपघातानंतर नवे कागदी नियम आणि जुनीच परिस्थिती, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading