Rayat Samachar

मनोरंजनासह प्रबोधनासाठी…

Crime | रूपाली चाकणकरांचा राजीनामा; आरोपांच्या पार्श्वभूमीवर नैतिक जबाबदारी स्वीकारत घेतला निर्णय

file 000000003cd47208a4da5978872fbaf0

मुंबई | २०.३ | रयत समाचार

राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या घडामोडीत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा सुपूर्द केला असल्याची माहिती स्वतः चाकणकर यांनी दिली.

चाकणकर यांनी सांगितले, सध्या विविध माध्यमांमधून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी, यासाठी त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात योग्य तो निर्णय आदरणीय सुनेत्रावहिनी घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या संपूर्ण प्रकरणाबाबत लवकरच सविस्तर भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या राजीनाम्यामुळे राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, अशोक खरातचे काय होते ? पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.