अहमदनगर | १९.३ | रयत समाचार
(Business) अहिल्यानगर ब्राह्मण बिझिनेस नेटवर्क वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून समाजातील व्यावसायिकांना एकत्र आणून आपापसात ऋणानुबंध निर्माण करून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा सुरभि हाॅस्पिटलचे चेअरमन अनिरुद्ध देवचक्के यांनी केले. अहिल्यानगरमध्ये ‘ब्राह्मण बिझिनेस नेटवर्क वेलफेअर असोसिएशन’ने महिला उद्योजिकांना सन्मानित करून त्यांना प्रोत्साहन दिले आहे. या कार्यक्रमात देवचक्के बोलत होते.
(Business) अनिरूध्द देवचक्के पुढे म्हणाले, यामध्ये अधिक भर घालत आत लवकरच संस्थेचे मोबाईल ॲप तयार करून त्याद्वारे व्यवसाय ऋद्धीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ब्राह्मण समाजातील महिलाही आता मागे नसून उद्योग क्षेत्रात त्या आघाडीवर आहेत. हे या पुरस्कार सोहळ्याने दिसून आले आहे. या उद्द्योजिकांना भविष्यात अधिक प्रोत्साहन संस्था देणार आहे.
(Business) पुरस्कार वितरण प्रसंगी देशपातळीवरील प्रसिद्ध उद्योजिका कामाक्षी जोगळेकर- बर्वे म्हणाल्या, आज सर्व क्षेत्र महिलांनी पादाक्रांत करत आपला कामाचा ठसा उमटवत यशस्वी होत आहेत. स्त्रीला सुपर वूमन होण्याची गरज नाहीये तर जे काम तिने निवडले आहे ते तिने निश्चयाने करणे आवश्यक आहे. प्रत्येकाची मदत घेऊन आपला परीघ वाढवा. यशस्वी उद्योजिका होण्याचा निश्चयाने या क्षेत्रात जास्तीत जास्त महिलांनी आता पुढे यावे. रोजगार देणाऱ्या होऊन इतरांना सक्षम करावे. या कार्यक्रमाची अनेक महिला निश्चित प्रेरणा घेतली.
अहिल्यानगरच्या ब्राह्मण बिझिनेस नेटवर्क वेलफेअर असोसिएशन आणि भगिनी निवेदिता सहकारी बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण महिला उद्योजिकांना पुरस्कार वितरण समारंभात उद्योजिका कामाक्षी जोगळेकर- बर्वे यांनी मार्गदर्शन करून स्वतःच्या उद्योगाची यशोगाथा उपस्थित महिलांसमोर मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा सुरभि हाॅस्पिटलचे चेअरमन अनिरुद्ध देवचक्के होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष चिन्मय सुखटणकर, ज्येष्ठ उद्योजिका मंदा सोमणी, अनिरुद्ध घैसास, वैशाली लोहगावकर, भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या व्यवस्थापिका ज्योती सातपुते आदींसह बिबिएनचे सर्व ट्रस्टी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातून आलेल्या महिला उद्योजिका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात कामाक्षी जोगळेकर- बर्वे यांची प्रकट मुलाखत शिल्पा सोमणी व धनश्री कुलकर्णी यांनी घेतली.
प्रास्ताविक पुरस्कार समितीच्या प्रमुख शिल्पा सोमणी यांनी केले तर अपूर्वा काळे यांनी कामाक्षी जोगळेकर- बर्वे यांचा परिचय करून दिला. स्पर्धेचे परीक्षण गंधाली भिडे, कल्पिता रानडे आणि डॉ. वर्षा वैद्य यांनी केले. परीक्षकांचा परिचय निखिल कुलकर्णी यांनी केला, तर प्रायोजकांचा परिचय आसावरी नातू आणि उमेश भालेराव यांनी केला.
या कार्यक्रमात स्व. कुसुम बाळकृष्ण लोहगावकर स्मृती पुरस्कार आनंद महिला स्वयंसहायता संस्थेच्या चारूलता कस्तुरे, मंदा सोमणी नवउद्योजिका पुरस्कार बुक सागा प्रकाशनच्या प्रिया लोकरे- क्षीरसागर, स्व. गीता गोडबोले – घैसास स्मृती पुरस्कार अंजली दंडवते, प्रियंका पोळ, डॉ. अनघा पारगावकर, भूपाली मिसळ व श्रुती मनवेलीकर आदींना कामाक्षी बर्वे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सूत्रसंचालन प्रा. स्नेहा रानडे व स्पर्धेचे निकाल वाचन डॉ.महेश मुळे यांनी केले. वर्षा जोशी यांनी आभार मानले. यावेळी श्रीपाद पुणतांबेकर, अमित परंडकर , मिलिंद कुलकर्णी, ह्रषिकेश धर्माधिकारी, संदीप भापकर, स्नेहल धर्माधिकारी आदींनी परिश्रम घेतले.
Womens Power: वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
