पुणे | १४.३ | रयत समाचार
(Literature) पाली भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अखिल भारतीय पाली साहित्य संमेलन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन रविवारी ता. २२ मार्च रोजी सकाळी १० वाजता सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, भवानी पेठ (टिंबर मार्केट), पुणे येथे होणार आहे.
(Literature) पद्मपाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित संमेलनासाठी देशभरातील पाली भाषा अभ्यासक, संशोधक आणि साहित्यप्रेमी सहभागी होणार आहेत. पाली भाषा ही तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची भाषा मानली जाते. अलीकडेच पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे तिच्या अभ्यास आणि प्रसाराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
(Literature) या संमेलनाच्या माध्यमातून पाली भाषेचा प्रचार प्रसार करण्याबरोबरच बुद्ध विचारधारेचा संदेश समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. संमेलनात विविध विषयांवर व्याख्याने व चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार असून साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9822098870 / 9822917119 या क्रमांकावर संपर्क साधावा.


