Social | एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन अध्यक्षपदी सुभाष वारे; डॉ. पारीख यांच्या निधनानंतर विश्वस्त मंडळाचा निर्णय

डॉ. जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पुणे | ८.३ | रयत समाचार

(Social) ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. जी.जी. पारीख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांची एकमताने निवड करण्यात आली. विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

(Social) ही बैठक प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक आणि विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत फाउंडेशनच्या पुढील कामकाजाबाबत चर्चा करतानाच अध्यक्षपदासाठी सुभाष वारे यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.

(Social) बैठकीस विश्वस्त डॉ. मनिषा गुप्ते, ॲड. सुरेखा दळवी, किरण ठाकूर, ॲड. संतोष म्हस्के, चंद्रकांत निवगुने, सुभाष वारे, मधू पाटील, आनंद थोरात आणि सुभाष लोमटे आदी उपस्थित होते.
समाजवादी विचारांचा प्रसार, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि सामाजिक चळवळींना बळ देण्यासाठी फाउंडेशनचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai

Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading