मुंबई | ७.३ | रयत समाचार
(Politics) कै.अजित पवार यांच्या संशयास्पद विमान अपघात प्रकरणाबाबत कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेऊन या प्रकरणातील आतापर्यंत जमा केलेल्या तपशीलांची माहिती दिली. तसेच अपघाताच्या चौकशीसंदर्भात सुरू असलेल्या पाठपुराव्याचीही सविस्तर चर्चा करण्यात आली.
(Politics) या भेटीदरम्यान रोहित पवार यांनी अपघाताशी संबंधित कागदपत्रे, उपलब्ध माहिती आणि चौकशीसाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा सुनेत्रा पवार यांना दिला. अपघाताच्या सत्य परिस्थितीचा शोध घेण्यासाठी योग्य तपास व्हावा, अशी मागणीही त्यांनी मांडली.
(Politics) यावेळी या दुर्घटनेत अजित पवार यांच्यसह मृत्यू झालेल्या जाधव, माळी आणि पाठक कुटुंबियांच्या मागण्यांबाबतही चर्चा करण्यात आली. मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार व्हावा, यासाठी आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा केला जाईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.
रोहित पवार पुढे म्हणाले, या अपघाताच्या चौकशीसंदर्भात संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून सत्य समोर यावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
