World news | सीएसआरडीचे शुभम हंबीरराव यांची इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय गेम्ससाठी निवड; ॲथलेटिक्ससाठी करणार भारताचे प्रतिनिधित्व

8th Youth Games Indo-Nepal International Series 2026

SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | २७.२ |रयत समाचार

(World news) येथील भा.पां. हिवाळे शिक्षण संस्थेच्या सीएसआरडी समाजकार्य महाविद्यालयाच्या एमएसडब्ल्यूचे विद्यार्थी तथा महाराष्ट्रातील युवा धावपटू शुभम अरुण हंबीरराव यांची २०० मीटर अ‍ॅथलेटिक्स प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली. युथ गेम्स कौन्सिल इंडिया Youth Games Council India (YGCI)च्या वतीने नियोजित ८ व्या युथ गेम्स इंडो-नेपाळ इन्टरनॅशनल सिरीज २०२६ (8th Youth Games Indo-Nepal International Series 2026) स्पर्धेसाठी त्यांना अधिकृत निवडपत्र देण्यात आले.

(World news) अलीकडेच गोवा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शुभम यांची ही निवड करण्यात आली. ही स्पर्धा २२ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान नेपाळमधील पोखरा (Pokhara) येथे होणार आहे.

(World news) स्पर्धेच्या आयोजनात युजीसीआय सोबत आंतरराष्ट्रीय क्रीडा भागीदारांचा सहभाग असून, खेळाडूंना एसी/नॉन-एसी बस प्रवास (गोरखपूर- नेपाळ- परत), निवास, भोजन, आयडी कार्ड, इंडिया ब्लेझर, टीम ट्रॅकसूट, किट बॅग, सहभाग प्रमाणपत्र तसेच गुणवत्तेनुसार पदक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय शहर दर्शन, समारोप सोहळा, माध्यम कव्हरेज आणि टीम छायाचित्रांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या खेळाडूंनी २२ मार्च २०२६ पूर्वी आपली सहभाग नोंद इमेलद्वारे ([email protected]) किंवा संबंधित प्रशिक्षक, जिल्हा समन्वयकांकडे करणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश शुल्क सादर करणे बंधनकारक आहे.

शुभम हंबीरराव यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रासह अहिल्यानगरच्या क्रीडाक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या आंतरराष्ट्रीय यशासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या कामगिरीमुळे भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावेल, अशी प्रतिक्रिया सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी व्यक्त केली. डॉ. सुरेश मुगुटमल, डॉ. प्रदिप जारे, डॉ. विजय संसारे, डॉ. आसावरी झपके, ट्विंकल ईश्वरी, डॉ. जैमोन वर्गीस, प्रा. सॅम्युअल वाघमारे तसेच टीम रयत समाचार यांनी शुभम हंबीरराव यांच्या क्रिडाकार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

हे ही वाचा : Political Economy | बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

 

Share This Article