अहमदनगर | २०.२ | रयत समाचार
(India news) नगर अर्बन बँकेतील २९१ कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात फॉरेंसिक ऑडीटरने एकूण १०५ जणांना आरोपी दाखविल्याची माहिती बँकेचे माजी संचालक तथा बँक बचाव समितीचे शिलेदार राजेंद्र गांधी यांनी दिली. मात्र या तपास प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेत अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे रेकॉर्डवर न घेतल्याचा तसेच काही आरोपींना परस्पर वगळल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे.
(India news) अधिक माहिती देताना गांधी यांनी सांगितले की, काही निरपराध व्यक्तींना आरोपी करण्यात आले असून, आरोपींनी सादर केलेले सोयीस्कर खाते उतारे तपासण्यात आले आहेत. तपासात मुद्दाम गुंतागुंत निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला.
(India news) ही गुंतागुंत आम्ही सोडवणार आहोत. रिजर्व्ह बँकेचे आदेश आणि फॉरेसिक ऑडीटरने लपविलेली अनेक कागदपत्रे आम्ही गोळा केली आहेत. ती माननीय न्यायालयासमोर सादर करून योग्य न्यायनिवाड्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे गांधी यांनी स्पष्ट केले. तसेच आरोपींकडून चालढकल केली जात असून, मिळालेल्या जामिनाचा दिखावा करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काही व्यक्तींमार्फत सोशल मीडियावर फिर्यादीचा मानसिक छळ केला जात असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. मी मनाने व अभ्यासाने भक्कम आहे. सत्य बोलत असल्यामुळे कोणतीही भीती नाही, असे ते म्हणाले.
मुख्य खटल्याचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू होऊन अंतिम चार्जशीट लवकर दाखल व्हावी आणि आरोपींना न्यायालयासमोर उभे करण्यात यावे, हीच आपली प्रामाणिक इच्छा असल्याचे गांधी यांनी सांगितले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
