World news | शिवजयंतीकडे आमदारांनी फिरवली पाठ; परदेश दौऱ्यात व्यस्त; प्राधान्यक्रम चुकला?

शिवप्रेमींमधे संताप

रयत समाचार वृत्तसेवा
4 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | २०.२ | रयत समाचार

(World news) १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी राज्यासह देशभर शिवजन्मोत्सव, अभिवादन आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू असताना, महाराष्ट्रातील काही आमदार वेल्स या इंग्लंड परदेश दौऱ्यावर असल्याची बाब चर्चेचा विषय ठरली आहे. शिवरायांची रयत असलेल्या महिला, शेतकरी, बेरोजगार तरुण, पायाभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा अपेक्षित असताना काही लोकप्रतिनिधी वेल्स देशात ‘अभ्यास’ दौर्‍यात व्यस्त असल्याने जनतेत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

(World news) शिवनेरीवरील राज्याच्या महत्वाच्या शिवजन्मोत्सव कार्यक्रमात ही हौशी मंडळी अनुपस्थित राहिल्याने राज्यभर शिवप्रेमींमधे चर्चा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शाश्वत नेतृत्वाच्या संकल्पनांवर चर्चा महत्त्वाची असली तरी शिवजयंतीसारख्या ऐतिहासिक दिवशी राज्यात उपस्थित राहणे अपेक्षित होते, अशी भावना शिवप्रेमींकडून व्यक्त होत आहे. शिवाजी महाराजांच्या मुख्य कार्यक्रमाकडे या आमदारांनी पाठ फिरविल्यामुळे खऱ्या शिवप्रेमींमधे संताप व्यक्त होत आहे.World news

(World news) वेल्स विद्यापीठातर्फे आयोजित ‘शाश्वत नेतृत्व आणि जागतिक नागरिकत्व’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांचा अभ्यास दौरा सध्या सुरू असून, १९ फेब्रुवारी रोजी कार्डिफ येथील वेल्श संसद (सेनेड सिमरू) येथे भेट देण्याचा विशेष सन्मान शिष्टमंडळाला लाभला. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात अनेक मान्यवर सदस्य सहभागी झाले होते, अशी माहिती आमदार राम शिंदे यांनी दिली.
या भेटीदरम्यान लोकशाही मूल्ये, सांस्कृतिक ओळख आणि समावेशक विकास यावर सखोल चर्चा झाली. महाराष्ट्र आणि वेल्स या दोन प्रदेशांतील संस्थात्मक संवाद अधिक दृढ करण्यासाठी परस्पर सहकार्याचे विविध मार्ग यावेळी तपासण्यात आले.World news

महाराष्ट्राच्या शिष्टमंडळात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार योगेश टिळेकर, डॉ. विश्वजीत कदम, विक्रम पाचपुते, मनीषा कायंदे, परिणय फुके, अमित गोरखे, सुमित वानखेडे, स्नेहा दुबे, नमिता मुंदडा, विक्रम काळे, विक्रांत पाटील, वरुण सरदेसाई आणि बाबासाहेब देशमुख यांचा समावेश होता.

वेल्श सरकारच्या कौन्सिल जनरल आणि मंत्री ज्युली जेम्स यांनी शिष्टमंडळाचे स्वागत करताना शैक्षणिक आणि कायदेविषयक सहकार्य वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच आशिया नेटवर्कच्या प्रमुख समांथा डायमंड, राजकीय विश्लेषक इस्टिन डेव्हिस आणि विभागप्रमुख लॉइड हॅरिस यांच्याशीही विचारांची देवाणघेवाण झाली.
लोकशाही संस्था अधिक सक्षम करणे. भाषिक व सांस्कृतिक वारसा जतन करणे. शाश्वत विकासाला चालना देणे.अक्षय्य ऊर्जा सहकार्य वाढविणे. शिक्षण, फिनटेक, उत्पादन आणि नवोन्मेष क्षेत्रात परस्पर भागीदारी, या विषयांवर चर्चा झाली.
मुख्य भाषणास प्रारंभ करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्याचा मान राम शिंदे यांना मिळाला. आंतरराष्ट्रीय लोकशाही सभागृहात “जय भवानी, जय शिवाजी” असा जयघोष करत स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
सुशासन, स्वाभिमान आणि नैतिक नेतृत्वाचे सार्वत्रिक प्रतीक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जगभर अभ्यासला जातो. साता समुद्रापलीकडे त्यांच्या नावाचा उच्चार करणे हा अत्यंत अभिमानाचा क्षण होता, असे राम शिंदे यांनी सांगितले.
UWTSDच्या शैक्षणिक सहभागातून महाराष्ट्राच्या कायदेकर्त्यांना सार्वजनिक धोरण आणि कायदेप्रक्रियेतील जागतिक सर्वोत्तम पद्धतींबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. या भेटीमुळे केवळ शैक्षणिक देवाणघेवाणच नव्हे, तर विविध लोकशाही व्यवस्थांमधील संवाद अधिक गतीमान होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
ही भेट महाराष्ट्र आणि वेल्समधील शाश्वत भागीदारीचा पाया अधिक मजबूत करणारी ठरत असून, वेल्श यजमानांना महाराष्ट्र भेटीचे औपचारिक निमंत्रण देण्यात आले. लोकशाही, संवाद आणि सहकार्याचा हा प्रवास अधिक बळकट होत राहो, अशी अपेक्षा व्यक्त करत राम शिंदे यांनी वेल्सचे आभार मानले.

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading