India news | शिर्डी एमआयडीसी डिफेन्स क्लस्टरसाठी सरसावले विखे पाटील; संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना भेटीचे आवातणे

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नवी दिल्ली | ११.२ | रयत समाचार

(India news) अहिल्यानगर जिल्ह्यात विकसित होत असलेल्या डिफेन्स क्लस्टर प्रकल्पाला अधिक बळ देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

(India news) या भेटीदरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योगांना चालना देण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती विखे पाटील यांनी संरक्षणमंत्र्यांना दिली. तसेच, शिर्डी औद्योगिक वसाहतीत उभारल्या जात असलेल्या डिफेन्स प्रकल्पांच्या प्रगतीबाबतही सकारात्मक संवाद झाला.

(India news) याबाबत पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले, या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून उद्योगविकासाच्या दृष्टीने शिर्डी एमआयडीसीमध्ये मोठी क्षमता आहे.
दरम्यान, केंद्र सरकारचा पाठिंबा सातत्याने मिळावा आणि या प्रकल्पांना अधिक गती मिळावी, यासाठी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांना शिर्डी औद्योगिक वसाहतीतील डिफेन्स प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले. यावर त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.

हे ही वाचा : Public issue | महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; रस्त्यांवरील अपघातात जखमी वा मृत्यू झाल्यास मिळणार नुकसान भरपाई; प्रशासक यशवंत डांगे यांचे अर्ज करण्याचे आवाहन

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading