अहमदनगर | २.२ | रयत समाचार
(Amc) अहिल्यानगर महापालिकेत भाजपराष्ट्रवादी काँग्रेस युतीने महापौर व उपमहापौर पदांसाठी उमेदवार निश्चित केले. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती अमोल गाडे तर उपमहापौरपदासाठी भाजपचे धनंजय कृष्णा जाधव यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या.
(Amc) यासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आ. संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक पार पडली. बैठकीत युतीची रणनीती, संख्याबळ आणि निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

