मुंबई | २९.१ | रयत समाचार
(Ajit Pawar Accident) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्य शासनाने २८, २९ व ३० जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर केला आहे. या कालावधीत राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत.
(Ajit Pawar Accident) सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार काल बुधवारी ता. २८ जानेवारी २०२६ रोजी राज्य शासनाची सर्व कार्यालये बंद ठेवण्यात आली तसेच, २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांत राज्यातील सर्व शासकीय इमारतींवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर (हाफ मास्त) फडकविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
(Ajit Pawar Accident) या शोककालावधीत राज्यभरात कोणतेही अधिकृत शासकीय कार्यक्रम, समारंभ किंवा सार्वजनिक उत्सव आयोजित केले जाणार नाहीत. संबंधित आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासकीय यंत्रणांना देण्यात आले आहेत.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या या शासकीय दुःखवट्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोकमय वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून सर्व शासकीय कार्यालयांना तत्काळ सूचना देण्यात आल्यात.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
