(Sports) भारतीय युवा खेल परिषद अंतर्गत गोवा येथे पार पडलेल्या नॅशनल गेम्स 2025-26 स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचा सुपुत्र आदित्य अशोक साठे याने ॲथलेटिक्समधील लांब उडी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
(Sports) ता. 20, 21 व 22 जानेवारी रोजी गोव्यातील पोद्देम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मापुसा येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशातील विविध राज्यांमधील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत आदित्यने दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
(Sports) अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक रेसिडेन्शिअल ज्युनिअर कॉलेज, अहिल्यानगर 12 वी वर्गात विद्यार्थी असून, राणा सिंग व शंकर गायकवाड पाटील यांच्या हस्ते त्याला ट्रॉफी व पदक प्रदान करण्यात आले.
धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील चिंचपुर(बु.)येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आदित्यच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आई-वडील शेती करून कुटुंबाचा गाडा चालवतात. आई–वडील,आजी एक बहिण असे एकत्र कुटुंब असलेल्या घरातून राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता घडल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.
यशाबद्दल रेसिडेन्शिअल कॉलेजचे दादासाहेब वांढेकर यांनी आदित्यचे विशेष अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्यच्या या सुवर्णयशाने धाराशिव जिल्ह्याचा क्रीडाक्षेत्रातील लौकिक आणखी वाढला आहे.