Advocate | वकिली पेशातून न्यायाबरोबर समाजसेवेचेही कार्य– माजी आमदार घुले पाटील; ‘लांडे पाटील लॉ फर्म’चे उदघाटन संपन्न

शेवगाव | ०४.१० | रयत समाचार

(Advocate) अनेक वकिलांनी न्यायदानाबरोबरच समाजाच्या विविध प्रश्नांवर उपाय शोधत समाजकार्यात मोलाची भूमिका निभावली आहे. वकिली पेशा म्हणजे फक्त पक्षकारांना न्याय मिळवून देणे नसून समाजाचे प्रश्न सोडविण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केले.

(Advocate) शेवगाव येथे विजयादशमीच्या मुहूर्तावर भाकपचे राज्य सेक्रेटरी ॲड. सुभाष लांडे पाटील यांचे सुपुत्र ॲड. रजत लांडे पाटील व ॲड. साहिल लांडे पाटील यांच्या वकिली व्यवसायातील पदार्पणानिमित्त सुरु झालेल्या ‘लांडे पाटील लॉ फर्म’  कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार घुले पाटील, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रामदास आगळे व ॲड. कॉ. बन्सी सातपुते यांच्या हस्ते फीत कापून झाले.

(Advocate) यावेळी माजी सभापती अरूण पाटील लांडे, जनशक्ती विकास आघाडीचे ॲड. शिवाजीराव काकडे, कॉ. स्मिता पानसरे, तहसीलदार संतोष काकडे, उपाध्यक्ष ॲड. मुनाफ शेख, शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. अविनाश मगरे, प्राचार्य शिवाजीराव देवढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
माजी आमदार घुले म्हणाले, ॲड. सुभाष लांडे पाटील यांनी वकिली व्यवसायातून व समाजकार्यातून शेवगावचे नाव राज्य व देशपातळीवर नेले आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता त्यांची मुले वकिली क्षेत्रात उतरत असल्याने गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम आणखी जोमाने होईल.
कार्यक्रमात ॲड. शिवाजीराव काकडे, कॉ. बन्सी सातपुते, प्राचार्य देवढे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲड. सुभाष लांडे यांनी केले तर आभार ॲड. विशाल लांडे यांनी मानले.
दरम्यान, अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनीही लांडे पाटील लॉ फर्मला भेट देत चि. ॲड. रजत लांडे व ॲड. साहिल लांडे यांना शुभेच्छा दिल्या.

हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

Share This Article