World news | पूरग्रस्त भारतीयांसाठी मदतीचा हात द्या; ‘घर घर लंगर सेवा’च्या माध्यमातून मदतीचे आवाहन

उपसंपादक | दिपक शिरसाठ

अहमदनगर | ४ सप्टेंबर | रयत समाचार

(World news) पंजाब, हिमाचल व हरियाणा राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे हजारो कुटुंबांचे जगणे विस्कळीत झाले आहे. नद्यांच्या पुराच्या पाण्याने घरे, जनावरे व शेतजमीन उध्वस्त झाली असून पीडित कुटुंबांना तातडीने मदतीची गरज आहे. या पार्श्वभूमीवर सनी वाधवा व लिओ क्लब अहमदनगर यांनी पुढाकार घेत मदतीसाठी मोहिम हाती घेतली आहे.

(World news) या उपक्रमात ‘घर घर लंगर सेवा’ सहभागी झाली असून पूरग्रस्तांसाठी तातडीने आवश्यक असणारे साहित्य – १५ x १५ फूट ताडपत्र्या, सॅनिटरी पॅड्स, दुध पावडर पुरविण्यात येणार आहे.World news

(World news) ‘गुरु अर्जुन समाजिक प्रतिष्ठान’ या संस्थेमार्फत मदतीचे नियोजन करण्यात आले असून सर्वांना या कार्यात हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “आपली छोटीशी मदतही एखाद्या कुटुंबासाठी मोठा दिलासा ठरू शकते,” असे आयोजकांनी स्पष्ट केले.

देणगीसाठी बँक तपशील :
बँक – ॲक्सिस बँक
Account Name : Guru Arjun Samajik Pratisthan
Account No. : 215010100014580
IFSC : UTIB0000215
Branch : Main Branch, Ahilyanagar
संपर्क : 9423162727 / 9960605115 / 9881770020

पूरग्रस्त बांधवांसाठी नगरकरांनी पुढाकार घेऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांसह टीम रयत समाचारने केले आहे.

TAGGED:
Share This Article