मुंबई | २१ ऑगस्ट | रयत समाचार
(Politics) वेगवेगळ्या समाजांना खूष करून मतांची झोळी भरण्यासाठी महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर अनेक आर्थिक विकास महामंडळांची घोषणा केली होती. मात्र निवडणुकीनंतर या महामंडळांना ना निधी देण्यात आला, ना अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
(Politics) ते पुढे म्हणाले की, ब्राम्हण समाजासाठी स्थापन केलेल्या ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळा’साठी सरकारने सहा अधिकारी नेमले आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. पण, जैन, तेली, हिंदू खाटिक, नाभिक, लिंगायत, गुरव, वडार, लोणारी, रामोशी, धनगर आदी समाजांच्या आर्थिक विकास महामंडळांना अजूनही सक्षम अधिकारी व आवश्यक निधी मिळालेला नाही.
(Politics) आ. पवार यांनी मागणी केली की, सरकारने सर्वच समाजांच्या महामंडळांवर कार्यक्षम पदाधिकारी व अधिकारी नेमावेत आणि पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. तेव्हाच या महामंडळांच्या स्थापनेमागचा हेतू पूर्ण होईल व समाजांना खरी उन्नती साधता येईल.
