मुंबई | २६ जुलै | प्रतिनिधी
(Mumbai news) प्रगतिशील लेखक संघ, मुंबई शाखेच्या वतीने सामाजिक आणि जातिविरोधी लेखन करणारे अभ्यासक तेजस हरड यांच्यासोबत संवाद साधण्याचा एक विशेष कार्यक्रम २९ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम परळ, मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दळवी बिल्डिंगमधील रुद्र हाइटसच्या तिसऱ्या मजल्यावर सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे.
(Mumbai news) तेजस हरड हे सध्या अमेरिकेतील पेनसिल्व्हानिया विद्यापीठाच्या ‘अॅननबर्ग स्कूल फॉर कम्युनिकेशन‘ मध्ये पीएचडीचे विद्यार्थी आहेत. त्यांनी सामाजिक न्याय, माध्यमांची भूमिका, जातिव्यवस्था आणि जातिविरोधी चळवळींवर विपुल लेखन केले असून त्यांचे विचार आजच्या तरुणाईला प्रभावी दिशा देणारे आहेत.
(Mumbai news) ते ‘द सत्यशोधक’ या डिजिटल प्रकाशनाचे संस्थापक व संपादक असून, यापूर्वी त्यांनी द क्विंट, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली या प्रतिष्ठित संस्थांमध्येही काम केले आहे. २०१९-२० मध्ये रॉयटर्स इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ जर्नलिझममध्ये त्यांची पत्रकार फेलो म्हणून निवड झाली होती. त्यांनी द हिंदू, हिंदुस्तान टाईम्स, द कॅरव्हॅन, द वायर, द प्रिंट, द न्यूज मिनिट, राउंड टेबल इंडिया या माध्यमांमध्ये लेखन केले आहे.
त्यांचे सध्याचे पीएचडी संशोधन माध्यमांच्या पर्यायी स्वरूपावर आणि माध्यमे जातिविरोधी चळवळींना कशा प्रकारे आकार देतात यावर आधारित आहे. माध्यमे, तंत्रज्ञान व वैचारिक धोरणे वापरून जातिनिर्मूलनाचे कार्य करण्यासाठी त्यांचा कटाक्ष राहिलेला आहे.
प्रगतिशील लेखक संघातर्फे सर्वांनाच या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कॉ.डॉ. श्रीधर पवार यांना 9619195198 या क्रमांकावर संपर्क करावा.
हे ही वाचा : महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळ
History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
