१०० संविधान कीर्तन संकल्प
मुंबई | १२ जुलै | प्रतिनिधी
(Religion) जात, धर्म, पंथ याच्या पलिकडे जाऊन माणसामाणसात समता आणि बंधुता निर्माण करणारी शिकवण वारकरी संतांनी समाजाला दिली. ही शिकवण म्हणजेच समतेवर आधारित लोकशाहीची मूळ प्रेरणा असल्याचे प्रतिपादन माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी येथे केले.
(Religion) गिरगावमधील माधवबाग सभागृहात दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या २४ व्या गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी ‘काल्याचे कीर्तन’ सादर केले.
“याती कुळ माझे गेले हारपोनी, श्रीरंगा वाचोनी अनू नेणे”
(Religion) या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावर आधारित कीर्तनातून त्यांनी वारकरी परंपरेतील समतेची शिकवण, सर्वसमावेशकता, लोकशाही मूल्ये आणि बंधुत्व यावर प्रकाश टाकला. त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातून सामाजिक संदर्भ उलगडून दाखवले.
ह.भ.प. शामसुंदर महाराजांनी वर्षभरात १०० संविधान-आधारित कीर्तन करण्याचा संकल्प केला आहे. या मालिकेतील हे दुसरे कीर्तन होते. कीर्तनानंतर बोलताना माजी खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले, वारकरी संप्रदायामध्ये लोकशाही मूल्ये खोलवर रुजलेली आहेत. शामसुंदर महाराजांनी ती प्रभावीपणे उलगडून दाखवली.
त्यांनी पुढे सांगितले की, दत्तात्रय महाराज कळंबे यांनीही या मूल्यांची जोपासना केली. त्यांनी फक्त अध्यात्म शिकवले नाही, तर जावळी बँकेची स्थापना करून कष्टकरी, शेतकरी, कामगारांचे जीवनमान उंचावले. मेटल कामगारांची संघटना उभी करून त्यांच्यासाठी सन्मानजनक करार केले. ही खरी सामाजिक भक्ती आहे.
कार्यक्रमात श्रीपाद महाराज जाधव यांना ‘कळंबे महाराज पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी आमदार अतुल शहा, नाना निकम, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कळंबे, प्रास्ताविक करणारे राजेंद्र शेलार, संयोजक आनंदराव गोळे आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन करण्यात आले होते.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.