India news | 9 जुलै देशव्यापी संप : परभणीत कामगार-कर्मचाऱ्यांचे प्रचंड आंदोलन

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

परभणी | ९ जुलै | प्रतिनिधी

(India news) कामगार आणि कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी संपाला ९ जुलै रोजी जोरदार प्रतिसाद मिळाला. परभणी जिल्ह्यात आयटक व किसान सभेच्या वतीने परभणी, गंगाखेड, मानवत, पाथरी, सेलू व सोनपेठ येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चे, धरणे व निदर्शने करण्यात आली. याबाबतची माहिती ॲड. माधुरी क्षीरसागर यांनी दिली.

 

(India news) या आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स, शालेय पोषण आहार कर्मचारी, रेशन गोदाम व रेल्वे गुड्समधील हमाल-माथाडी कामगार यांनी १००% सहभाग नोंदवला. आयटक संलग्न एमएससीबी वर्कर्स फेडरेशन, कंत्राटी बँक कर्मचारी, पोस्ट कर्मचारी, शिक्षकवर्ग यांचाही संपात सक्रीय सहभाग दिसून आला.

 

(India news) केंद्र व राज्य सरकारच्या कामगार व कर्मचारी विरोधी धोरणाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. चार लेबर कोड रद्द करावेत, जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावे, योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्यावे, कंत्राटीकरण व आऊटसोर्सिंग बंद करावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरील एफआरएस सक्ती थांबवावी, नगरपरिषदेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळावे, तसेच सर्व विभागातील कर्मचारी भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी मांडल्या.

 

किसान सभेच्या वतीने देखील विविध मागण्यांसाठी ठिकठिकाणी निवेदने देण्यात आली. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, पिक विमा योजनेतील शेतकरी विरोधी बदल रद्द करावेत, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतकऱ्यांना सौरपंप तात्काळ द्यावेत, हमीभावाचा कायदा करावा आणि २०२४ च्या थकीत पिक विम्याची रक्कम तात्काळ अदा करावी, अशा मागण्या यामध्ये समाविष्ट होत्या.
संपात आणि आंदोलनात मोठ्या प्रमाणावर कामगार, कर्मचारी व शेतकरी सहभागी झाले होते. यामुळे परिसरात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *