पुणे | १ जुलै | प्रतिनिधी
(Politics) आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट)ने तयारीला जोर दिला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांसमवेत पक्षाच्या नियोजनाची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.
(Politics) या बैठकीत मतदारसंघातील प्रत्येक प्रभागाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच, संघटनात्मक मजबुतीबरोबरच निवडणुकीत यश मिळवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज राहावे, असे निर्देश देण्यात आले. इच्छुक उमेदवारांनी पूर्ण ताकदीनिशी प्रचार व जनसंपर्क मोहिमेला सुरुवात करावी, असे आवाहन पक्षाच्या क्रीडा सेलचे पुणे शहराध्यक्ष डॉ. मदन कोठुळे यांनी केले.
(Politics) या बैठकीस डॉ. कोठुळे यांच्यासह ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, रवींद्रअण्णा माळवदकर, शहराध्यक्ष प्रशांतजट जगताप तसेच इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देतानाच, स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून प्रभागनिहाय प्रचारयोजना राबवण्याचे ठरवण्यात आले आहे.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.