मुंबई | १ जुलै | प्रतिनिधी
(Politics) महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे शिल्पकार व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
(Politics) यावेळी अजित पवार यांनी वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा उल्लेख करत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयांमुळे महाराष्ट्रात हरित क्रांती शक्य झाली, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
(Politics) स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १ जुलै हा दिवस ‘कृषीदिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना कृषीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही नमूद केले.

