मुंबई | २३ जून | गुरुदत्त वाकदेकर
(Mumbai news) मराठी एकीकरण समितीच्या वतीने आयोजित “मराठी शिलेदार मेळावा” काल प्रभादेवी, मुंबई येथे उत्साहात पार पडला. या राज्यस्तरीय मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी शिलेदार, पदाधिकारी आणि भाषाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Mumbai news) या मेळाव्यातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदीकरणाच्या धोरणांचा तीव्र निषेध करण्यात आला. मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्याची गरज अधोरेखित करत, हा लढा राजकीय नसून सामान्य मराठी जनतेच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा लढा आहे, असा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.
“मराठी ही केवळ भाषा नाही, ती अस्मिता, अर्थकारण आणि जनतेच्या हक्कांचा मुद्दा आहे. तिचे रक्षण करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे,”
असे मत मेळाव्यातून मांडण्यात आले.
(Mumbai news) प्रशासन, शिक्षण, साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रात मराठी विरोधी निर्णयांना संघटितपणे विरोध करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्रसिद्ध उद्योजक श्री. डी. एस. कुलकर्णी आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक पवार यांनी आपल्या भाषणांतून मराठी अस्मिता आणि हक्कांसाठी सामूहिक आणि सजग लढ्याचे महत्व अधोरेखित केले.
समितीचे कार्याध्यक्ष अँड. प्रदीप सामंत आणि अध्यक्ष श्री. गोवर्धन देशमुख यांनी मराठी भाषेच्या संरक्षणासाठी मजबूत संघटन व दीर्घकालीन लढ्याची गरज अधोरेखित करत, भावनिक आणि तत्त्वनिष्ठ भूमिका मांडली.
“मराठीचा प्रश्न हा केवळ भावनांचा नव्हे, तर मराठी जनतेच्या भविष्यासाठीचा लढा आहे,”



