अहमदनगर | १३ जून | प्रतिनिधी
(Rto) प्रादेशिक परिवहन कार्यालय, अहिल्यानगर येथे दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांसाठी नवीन क्रमांक मालिका सुरु करण्यात आली आहे. या मालिकेसाठी पसंती क्रमांक मिळवण्यासाठी इच्छुक अर्जदारांनी १६ व १७ जून २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २.३० या वेळेत खिडकी क्रमांक १४ वर अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.
(Rto) अर्जासोबत वाहन मालकाच्या नावाने तयार करण्यात आलेला अर्ज, पत्ता पुरावा, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांकासाठी देण्यात येणारा धनादेश ‘अहिल्यानगर कँप शाखा / ट्रेझरी शाखा (कोड क्र. १३२९६)’ यांच्यासाठी देय असावा.
(Rto) एका क्रमांकासाठी एकच अर्ज प्राप्त झाल्यास तो क्रमांक त्या अर्जदारास दिला जाईल. मात्र एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास, अर्जांची यादी १७ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
अशा प्रकरणात, इच्छुकांनी १८ जून रोजी दुपारी १.३० वाजेपर्यंत जादा रकमेचा बंद लिफाफ्यातील धनादेश सादर करावा. त्यानंतर दुपारी ३ वाजता लिलावासाठी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात उपस्थित राहावे लागेल. अर्जदार किंवा अधिकृत प्रतिनिधी यांना ओळखपत्र व प्राधिकारपत्रासह उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
लिलावात सर्वाधिक रकमेचा धनादेश सादर करणाऱ्यास पसंती क्रमांक देण्यात येईल. इतर अर्जदारांचे धनादेश परत करण्यात येतील. विहित वेळेत अनुपस्थित राहिलेल्या अर्जदारांचा विचार केला जाणार नाही. तसेच कोणत्याही अर्जदाराशी दूरध्वनी, मोबाइल वा एसएमएसद्वारे संपर्क साधला जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना प्रशासनाने दिली आहे.
