नवी दिल्ली | २४ मे| प्रतिनिधी
(India news) भारताच्या हवामान विभागाने (IMD) आज जाहीर केले की नैऋत्य मोसमी पाऊस (Southwest Monsoon) यंदा ता. २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला, जो सरासरीच्या तुलनेत ८ दिवस आधी पोहोचला. ही घडामोड कृषी क्षेत्रासह संपूर्ण देशासाठी दिलासादायक मानली जात आहे.
(India news) २००९ नंतरची सर्वात लवकर एंट्री : सामान्यतः नैऋत्य मोसमी पाऊस १ जून रोजी केरळमध्ये प्रवेश करतो. मात्र यंदा त्याचे आगमन २००९ नंतरचे सर्वात लवकर मानले जात आहे. २००९ मध्ये पाऊस ता.२३ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. त्यामुळे २०२५ ही सर्वाधिक लवकर आगमनाची दुसरी नोंद ठरली.
(India news) कृषी आणि जलस्रोत व्यवस्थापनावर सकारात्मक परिणाम : मोसमी पावसाच्या या लवकर आगमनामुळे देशातील अनेक भागांतील खरीप हंगामाच्या तयारीस गती मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची असून, बी-बियाणे पेरणीपासून सिंचन नियोजनापर्यंत अनेक गोष्टींवर याचा परिणाम होतो.
नैऋत्य मोसमी पावसाची माहिती : सामान्य आगमन : १ जून (केरळ). यंदाचे आगमन : २४ मे २०२५. २००९ मध्ये : २३ मे रोजी पाऊस दाखल झाला होता.
पावसाचा मार्ग : केरळ → कर्नाटक → महाराष्ट्र → मध्य भारत → उत्तर भारत
