जबलपूर | १४ मे | प्रतिनिधी
(Dirty politics) रा.स्व.संघ भाजपा नेता आणि मध्यप्रदेशचा मंत्री विजय शाह यांने ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह विधान केले, त्या दहशतवाद्यांच्या बहिण आहेत असे विकृत वक्तव्य केले होते. त्याच्या या देशद्रोही विधानानंतर विरोधकांकडून बडतर्फ करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान जबलपूर हायकोर्टाने त्याच्याविरुद्ध तातडीने FIR दाखल करण्याचा आदेश दिला.
(Dirty politics) याविषयी अधिक माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार म्हणाले, मध्यप्रदेशचे सत्ताधारी मंत्री विजय शाह यांनी एका सन्मानित मुस्लिम लष्करी अधिकाऱ्याला सार्वजनिकरित्या “दहशतवाद्यांची बहीण” म्हणत अपमानित केलं! मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून या घटनेची दखल घेतली आणि ती “देशद्रोह, धार्मिक तेढ निर्माण करणारा प्रकार आणि राष्ट्रीय एकतेसाठी धोका” असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. आज एफआयआर नोंदवला गेला नाही, तर उद्या न्यायालय पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे. अशी विषारी विचारसरणी असलेली व्यक्ती अजूनही मंत्री कशी? विजय शाहसारख्या धर्मद्वेष्ट्यांना सत्तेत ठेवणं म्हणजे कारभार नव्हे, तो सरळसरळ संस्थात्मक देशद्रोह आहे.
हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर



