नवी दिल्ली | १० मे | प्रतिनिधी
(Breaking News) भारत आणि पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थितीमध्ये एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दावा केला आहे की, भारत आणि पाकिस्तानने तात्काळ संपूर्ण युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) May 10, 2025
(Breaking News) ट्रम्प यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण आले आहे. तथापि, भारत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. परराष्ट्र मंत्रालयाच्या सायंकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात स्पष्टीकरण दिले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
(Breaking News) दरम्यान, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे, आणि ते युद्धविरामाच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे म्हटले आहे.
या घडामोडींमुळे दोन्ही देशांतील तणाव निवळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, अंतिम निर्णयासाठी भारताच्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे हि वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
1win football [url=http://1win1026.top/]http://1win1026.top/[/url] .