अहमदनगर | ४ मे | प्रतिनिधी
(Social) नुकतेच हैदराबादजवळील कांचा गचिबोवली येथे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा सरकारला फटकारले आणि वृक्षतोड थांबवण्याचे निर्देश दिले. या घटनांचे व्हिडिओ पाहून समाजमनातून हळहळ व्यक्त करण्यात आली. याच अनुषंगाने अहमदनगर येथील स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल आणि शिवतेज इलेक्ट्रिकलच्या संचालिका ऋतुजा जानवळे या उच्चशिक्षित नवदाम्पत्याने २४ एप्रिल रोजी स्वतःच्या झालेल्या लग्न सोहळ्यात मान्यवरांचा सत्कार समारंभ आणि मानपानाचा खर्च टाळून जेऊर परिसरातील डोंगरात वास्तव्यास असलेल्या मोर, हरिण आणि इतर प्राण्यांसाठी पाणवठ्यांवर टँकरद्वारे पाण्याची सोय केली. या दोघांनाही निसर्ग भ्रमणाची आवड; त्यामुळे आम्हीसुद्धा निसर्गाच देणं लागतो, असे म्हटले.
नव्याने सुरू होत असलेल्या संसारात आम्ही घर तर सांभाळूच, सोबत संघटना आणि निसर्ग जपणार आहोत, असे दोघांनी सांगितले.
(Social) यशवंत तोडमल आणि ऋतुजा जानवळे या दोघांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले; त्यामुळे आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी कसा होईल याचाही ते दोघे विचार करत आहेत. सोबतच या दोघांनी स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या कामासाठी ३१ हजारांची मदत संघटनेचे खजिनदार सागर कराळे यांना सुपुर्द केली. सर्वस्तरातून या उपक्रमाबद्दल नवदाम्पत्याचे कौतुक होत आहे.

हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.